पान:आरोग्यशास्त्र.pdf/९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हवामान आणि हवामापन ८५ उष्णता ह्यांमध्यें फरक असतो त्याकडे लक्ष दिले पाहिजे. उत्सर्जित उष्णता सूर्यापासून मानव शरीर व दुसरे घन पदार्थ व द्रव पदार्थ ह्यांचे पैकीं ज्यांचे ज्यांचेवर पोहोचते त्यांना त्यांना कढत करते. परंतु तिचे अंगीं हवा उष्ण करण्याचें फार थोडें सामर्थ्य असतें. सूर्याचे किरणां- पासून भूपृष्ठावर प्राप्त झालेल्या उष्णतेच्या लहरी अथवा लाटांमुळे छायेंतील उष्णता सिद्ध होते. समुद्रकिनाऱ्यावरील उष्णतामानावर समुद्राच्या पाण्याचा मोठा परिणाम होतो. तेथें हिंवाळा व उन्हाळा ह्या ऋतूंमधील अंतर कमी असतें. अशा हवेला समशीतोष्ण हवा म्हणतात. डोंगराळ प्रांतांत त्या भागांतील उंचीचे मानानें हवेंतील उष्णता कमी असते. समुद्रापासून दूर दूर अथवा मध्य भागांतील प्रांतांच्या हवेंत अधिक विषमता असते. हिवाळ्यांत ती फार गार असते व उन्हाळ्यांत ती फार उष्ण असते. वर दिग्दर्शित केलेल्या उष्णतामानांतील फेर- फारांशिवाय सूर्याच्या उदयास्तासंबंधाने हवेंत दैनिक फेरफार घडतात. हे समुद्रकिनाऱ्यापेक्षां ज्यास्त असतात. उष्णतामानाचा प्रकृतीवर परिणाम ज्या प्रदेशांतील उष्णतामानांत वरचेवर फरक पडतो व ज्यांतील उष्ण व शीत ऋतूंमध्ये उष्णतामानांत फार अंतर असतें अशा प्रदे- शांत मानवजातीपैकीं अत्यंत बलवान लोक निपजतात असे आढळून येतें. समशीतोष्ण प्रदेशांतील लोक अशक्त व दुर्बल असतात असें पाहण्यांत येतें. उन्हाचे उष्णतेपेक्षां समान अंशाची उष्णता अधिक अपायकारक असते. उष्ण कटिबंधांतील अधिक उष्णतेमुळे श्वासोच्छ्रासन कमी वेळां होतें. उष्ण व विरळ झालेल्या हवेंत कमी प्राणवायू असतो. श्वासाबरोबर अंत जाणाऱ्या प्राणवायूचें प्रमाण व उच्छ्वासाबरोबर बाहेर पडणाऱ्या कॅर्बानिक वायूचे प्रमाण कमी होतें. उच्च उष्णतामानामुळे जीवन-