पान:आरोग्यशास्त्र.pdf/९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ आरोग्यशास्त्र व्यापार एकंदरीनें कमी चालतात; हृदय क्षीण होतें, नाडी मंद होते, पचन बिघडतें, क्षुधा कमी होते व शरीरांतील पोषणव्यापार बिघडतो. ह्यामुळे शरीराचें वजन व सामर्थ्य कमी होतें. उष्ण कटिबंधांतील मज्जा- तंतूंसबधा विकार व अंतरिंद्रियांचे रोगाचा संबंध उच्च उष्णतामानाकडे आहे. अधिक उष्णतामानानें प्रत्यक्ष व दूरचे असे दोन प्रकारचे परिणाम होतात. लू लागणें, ज्वर, शरिरांतील कांहीं नैसर्गिक क्रिया विकृत होणें किंवा तहकुब होणें हे उच्च उष्णतामानाचे प्रत्यक्ष परिणाम आहेत. कष्टश्वास, रक्ताचें निकृष्टभवन आणि यकृत व आंतडी यांचे रक्तसंचया- पासून होणारे व्याधी हे रोग त्यामुळे कालांतराने होतात. आरोग्यावर शैत्याचे परिणाम उष्णतेच्या परिणामाच्या उलट होतात. अत्यंत शीतमानांत फार काळ राहिल्याने विशेषतः हातापायांतील सूक्ष्म धमन्या संकोचित होतात. त्यामुळे शीतोपहनन ( चिल्लेन ), कोथभवन (गॅग्रिन ) व बेशुद्धि हे रोग होतात. अपुरें अन्न खाणाऱ्या लोकांवर शैत्याचा परिणाम विशेषतः होतो. हवेचें उष्णतामान कांहींही असो, शैत्याचे दुष्परिणाम विरळा नाहींत. थंडीचे ऋतूंत अशक्त लोकांना शीतोपहनन व अंतरिंद्रियांत रक्तसंचयासंबंधी विकार होतात. थंडीनें बाह्यवर्ती रुधिराभिसरण व धर्मोत्पत्ति एकाएकीं कमी होते. हिंदुस्थानांत उष्णतामानांत जलदी अंतर पडत असल्यानें आरोग्यावर फार मोठा परिणाम घडतो. उष्णतामानांत एकाएकीं अंतर पडल्यानें यकृतवृद्धी, पोटशूळ, अतिसार व आव हे विकार सामान्यतः होतात. ओलावा असलेल्या हवेचा आरोग्यावर परिणाम कोरर्डे व ओलें असे हवामानाचे वर्ग करतात. हवेतील उष्णतामान वाढल्यानें त्यांतील आर्द्रता वृद्धिंगत होते. कमी उष्णतामानांत जी हवा दमट असते तीच उष्णता वाढल्यास कोरडी होते. वाफेमुळें इवें- तल उष्णता कमी होते. त्याचप्रमाणे हवेंत वाफ असल्यामुळे पृथ्वी-