पान:आरोग्यशास्त्र.pdf/९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हवामान आणि हवामापन ८ पासून हवेमध्यें उष्णता पोहोचण्याची क्रिया कमी प्रमाणांत होते. त्याच प्रमाणें हवेंत उतरणाऱ्या उष्णतेचें नियमन झाल्यानें व त्यांतील उष्णतामानामध्ये फेरफार कमी झाल्याने ओलाव्यामुळे देशाची हवा समशीतोष्ण होते. परंतु हवेंत ओलावा फार असल्यास फुप्फुसें व चर्म ह्यांतून बाष्पो- गमनाला प्रतिबंध होतो. हवेंत ओलावा असून उष्णता असली तर हवा कुंद वाटते. पण ओलाव्याबरोबर अत्यंत थंडी असल्यास अधिक त्रास होता. सर्द हवा सूक्ष्म जंतूंचे वाढीला अनुकूल असल्यामुळे सर्द हवा कोरड्यापेक्षां कमी आरोग्यदायक असते. कोरड्या पदार्थापेक्षां किंवा जागेपेक्षां ओल्या जागेमध्यें कुजण्याची क्रिया अधिक जलद होते. हवेच्या दाबाचा आरोग्यावर परिणाम: - आरोग्यावर हवेच्या दाबाचा परिणाम बराच घडतो. हवेचा कमी दाब व हवेचा अधिक दाब ह्या दोन सदरांखालीं त्यांचा विचार केला पाहिजे. हवेच्या कमी दाबाचा परिणामः - समुद्राचे सपाटीवर दर स्क्वेअर इंचावर तीन उंचीपर्यंत पाऱ्याचा स्तंभ चढतो किंवा १५ पौंड वजना- 'इतका हवेचा दाब असतो. पर्वतावर उंच भाग हवा पातळ असल्यानें हा दाब कमी असतो. उंचीमुळे हवेचा दाब कमी होतो. त्यासंबंधीं कोष्टक खाली दिलें आहे. अठराशें फूट उंचीवर एक पौंड दाब कमी होतो. समुद्रसपाटीपासून उंची फूट १८०० २५०० कमी दाबाचे प्रमाण १५ भाग कमी दाब होतो. १ ५००० ७५०० १६००० 34 " 99 " है "" " 99 39 "" 44 " "3 " २ "" " 36 39