पान:आरोग्यशास्त्र.pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૨૮ आरोग्यशास्त्र दर तीनशे फूट उंचीला १ अंश फॅरेनहैट इतकें उष्णतामान कमी होतें. हवा पातळ होते व त्या मानाने एक घनफूट हवेंतील प्राणवायूचें बजनही कमी होतें. कमी दाबामुळे नाडी व श्वासोच्छ्रास ह्यांचा वेग वाढतो. श्वासोच्छ्रास अधिक खोल व भरपूर होतो म्हणून पहाडी लोकांची छाती विशाल असते. त्यांचें हृदय व रक्तवाहिन्या मजबूत असतात. सहासात हजार फूट उंचीवर हृदय, फुप्फुसें व मूत्रपिंड ह्यांच्या क्रिया वृद्धिंगत होतात. ज्या आजारांत वरील इंद्रियांच्या क्रिया वृद्धिंगत झालेल्या असतात - जसें हृदाच्या पडद्याचे विकार, जुनाट कास ( खोकला ) मूत्रपिंडाचे व्याधी - ते रोग पहाडावर वाढतात. त्याचप्रमाणे अतिसार, आव, संधिवात इत्यादि प्रकारचे आजार अधिक होतात. हवेच्या अधिक दाबाचे परिणामः - अधिक दाबाचे परिणाम वर- ल्याचे उलट होतात. परंतु भिन्न स्थितीला अनुरूप प्रकृति बनते. हवामान - वर्गीकरण हवामानाचे शीत, समशीतोष्ण, उष्ण, पाहाडी, सखल भागांतील व समुद्र किनाऱ्याची इत्यादि वर्ग करतात. शीत हवामान ध्रुव व ५० अंश Latitude ह्यांचेमधील भागांत शीत हवामान असतें. ह्या भागांत हिंवाळा तीव्र असतो व तो अधिक काल टिकतो. सबंध वर्षाच्या उष्णतामानाचें मध्य परिमाण ० ते ५० अंश फॅरेन- हैट असतें. उन्हाळा फार थोडा असतो. पाऊस व पर्जन्यकाल बहुतेक नसतो, परंतु बर्फ पुष्कळ असतें. फुप्फुस व मूत्रपिंड ह्यांचेवर फार ताण पडतो. ह्या प्रदेशांतील मृत्युसंख्येचे प्रमाण सर्व जगांत अत्यंत कमी असतें असें कांहीं शोधकांचें मत आहे. कडक थंडीमुळे तेथील रहि- वाशी जोमदार, धष्टपुष्ट असतात व त्यांची पचनशक्ति उत्कृष्ट असते.