पान:आरोग्यशास्त्र.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हवामान आणि हवामापन ८९ परंतु तेथें भाजीपाला कमी मिळतो व तेथील रशिवाशांची राहणी स्वच्छ नसते. म्हणून त्यांना स्कर्वी नांवाचा रक्ताचा व मुखाचा रोग होतो.. शिवाय त्यांच्या मेंदूच्या शक्तीची वाढ चांगली होत नाहीं. समशीतोष्ण हवामान समशीतोष्ण हवामानाची मर्यादा ३५ ते ५० अंश Latitude पर्यंत असते. वर्षाच्या उष्णतामानाचें मध्य परिमाण ४० ते ५० अंश फॅरेनहैट असतें. हें हवामान सर्व जगांत अत्यंत आरोग्यकारक असतें. तेथें चार भिन्न भिन्न ऋतु असतात. उष्ण हवामान भूमध्य रेषा व अंश latitude ह्यांचे दरम्यान प्रत्येक बाजूचे भागांत उष्ण हवामान असतें. ह्या भागाचे भूमध्यरेषा, उष्ण कटिबंधाचा व सौम्य उष्ण कटिबंधाचा असे तीन पोटभाग आहेत. कडक उष्णतामान, पुष्कळ पर्जन्य व लांबलचक उन्हाळा व हिवाळा ह्रीं ह्या भागाचीं लक्षणे आहेत. पर्जन्याने उष्णतामान कमी होतें. वार्षिक पर्जन्य ४० इंचांपेक्षां बहुधा कमी नसतो. व दिवस व रात्रींतील उष्णतामानां - मधील अंतर थोडें असतें. उष्ण प्रदेशांत लू लागणे, विषूचिका (कॉलरा), पीतज्वर, डेंग्यू, यकृताचा विद्रधी (अॅक्सेस), देवी, आव, अतिसार, काला आजार हे आजार सामान्यतः होतात. पाहाडी हवामान पर्वतावर हवा वेगाने वाहाते. ती कोरडी व अधिक शुद्ध असते. त्यांत केर, धूर व धुरळा कमी असतो. हवा अधिक विरळ असते व तिचा दाब कमी असतो. त्यांत ओझोन अधिक असतो. ती थंड असते. दर ३०० फूट उंचीत एक अंश फॅरेनहैट उष्णता कमी होते. पर्वता- वर श्वासोच्छ्वास वेगानें व खोल चालतो. तो वरवर चालत नसल्यास छातीचा संकोच व विस्तार पूर्णपणें होतो. अशा ठिकाणीं फार काल