पान:आरोग्यशास्त्र.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९० आरोग्यशास्त्र राहिल्यानें छाती विशाल होते व हृदयाची क्रिया वाढते व रक्त वेगानें वाहतें. ह्यामुळे व हवा शीत व कोरडी असल्यामुळे क्षुधा व पचन वाढतात व शरीरांत चपलता येते. क्षयाचे रोग्यांना असल्या हवेपासून फायदा होतो. सखल व खोल प्रदेशांतील व भागांतील हवेचे परिणाम वरच्याचे उलट होतात. तरी पण त्या स्थितीला अनुरूप प्रकृति बनते. खोल खाणींतून मजूर मोठ्या मेहनतीचीं कामें करतात. पाण्याखाली पुलाचा पाया बांधतांना कामकऱ्यांना घनीकृत हवा भरलेल्या लोखंडी हौदांत रहावें लागतें. ह्यामुळे त्यांचे कान ठणकतात व स्नायु व मज्जाजंतूंसंबंधीं भावना व वेदना, चक्कर, अशक्तता आणि नाकांतून व जठरांतून रक्त वाहणें इत्यादि भावना होतात. समुद्रकिनान्याचे हवामान ह्या प्रदेशांत उन्हाळा व हिवाळा आणि दिवस व रात्र ह्यांचे उष्णता- मानांतील अंतर थोडें असतें. तें बहुतेक एकसारखे राहतें. तेथें आर्द्रता व पर्जन्य ज्यास्त असतो. हिंदुस्थानांतील कोंकण, गोवा वगैरे समुद्र- किनाऱ्याचे भाग व सिंव्हलदीप ह्यांतील हवामान वर दिल्याप्रमाणें असतें. तेथील हवा अधिक शुद्ध असते. त्यांत ओझोन असतो व त्यामुळे शरीर जोमदार होतें. झाडाजंगलाचा आणि समुद्र व सरोवराचे जलाचा हवेवर परिणामः झाडाजंगलाचा परिणाम हवामानावर पुष्कळ होतो. शीतकटिबंधांत झाडाझुडपांमुळे सूर्यकिरण जमिनीवर पोहोचत नाहींत. त्यामुळे जमीन सर्द व थंड राहते. परंतु झाडांमुळे गार वाऱ्याचे प्रवाहाला प्रतिबंध होतो. पण एकंदरीत शीतकटिबंधांत देखील झाडांपासून प्रतिबंध होतो.