पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणारी माता हे प्रार्थनेशी एकरूप होण्याचे उच्चतम उदाहरण आहे.
 आता प्रार्थना कोणी व केव्हा करावयाची? आपले कुटुंब सुखी आहे, सर्वांच्या प्रकृत्या बन्या आहेत, तरीसुद्धा आपण प्रार्थना करतच असतो. आणि कोणी आजारी पडला, अत्यवस्थ झाला तरी आपण प्रार्थना करतोच मग त्याचा गुण कोणाला येतो? ‘स्पिनड्रिफ्ट' नावाच्या एका संस्थेने यासाठी खूप संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. 'स्पिनड्रिफ्ट' हा मूळ जुना स्कॉटिश शब्द. त्याचा अर्थ समुद्राच्या लाटा व वारा यामुळे निर्माण होणारे त्या पाण्याचे तुषार हवा ही अदृश्य, सहज न जाणवणारी तर लाटा ह्या दृश्य, स्पर्शाला कळणाऱ्या, म्हणजे इंद्रिये सहज ओळखणाऱ्या. सुप्तार्थ असा की देह हा दृश्य व मन अदृश्य, यांचे एकमेकांशी नाते. या संशोधनासाठी काही मूलभूत प्रश्न / समस्या डोळ्यांसमोर ठेवल्या होत्या.
  (१) आत्मिक शक्तीने विकारापासून मुक्ती मिळते का? रोग बरे होऊ शकतात का?  (२) प्रार्थनेने जे यश मिळते त्याचे मोजमाप करता येईल का ? त्याला विज्ञानाधिष्ठित संशोधनाचे नियम लावता येतील का?
 (३) प्रार्थनेद्वारे मिळणारे यश परत परत मिळेल का? याची काही निश्चिती आहे का?
 या संस्थेने हाती घेतलेल्या काही प्रयोगांपैकी एक प्रयोग असा होता. 'राय' ह्या धान्याचे समभागात दोन ढीग केले गेले. ते एका पसरट काचपात्रात घातले. त्याचे दोन समभाग एका दोरीने केले व त्यात मातीसदृश एक रसायन घातले. हे दोन भाग म्हणजे 'अ' व 'ब' असे म्हणूया. त्यांतील एका भागातील बियांना लवकर मोड यावेत म्हणून प्रार्थना करण्यात आली व 'ब' भागातील बियांसाठी काहीही केले नाही. या बिया उगवून आल्यावर त्यांचे कोंब मोजण्यात आले. परत परत प्रयोगात ज्यांच्यासाठी प्रार्थना केली गेली त्या बियांना प्रार्थना न केलेल्या बियांपेक्षा खूपच जास्त कोंब फुटले होते. ह्या प्रयोगातून एक सिद्ध झाले की प्रार्थनेचा परिणाम फक्त मानवदेहापुरताच मर्यादित नसून इतरही जीवमात्रावर होऊ शकतो
.

 आपल्या दैनंदिन जीवनात आपण नेहमी निरोगी व रुग्ण या दोन्ही बांधवांसाठी प्रार्थना करतो. "सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।" ही आपली सर्व

१०३