पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रदर्शित केली. पण मी हल्ली क्षेत्रसंन्यास घेतला आहे. त्यालाही बरीच वर्षे लोटली आहेत. त्यातही मुंबईची गर्दी, पोल्युशन यांचा मला तिटकाराच वाटतो. त्यामुळे मी तेथे चर्चेसाठी जाण्याचे नाकारले व त्यांना अशी प्रमुख औषधे, आहार, लिनसीड ऑइलचा वापर व अध्यात्माचे स्वरूप लिहून कळविले. मात्र त्यांना एक सूचना केली की हे सगळे यांत्रिकपणे केल्यास त्याचा फारसा उपयोग होणार नाही व व्यक्ती-व्यक्तीचा सुद्धा स्वतंत्र विचार करूनच औषधे व आहार ठरवावा लागतो, हेही विसरता कामा नये
  अशा अनेक केसेसमध्ये मुख्यतः हृदयरोग, मधुमेह यांच्या सारख्या किंवा इतर जीर्ण केसेसमध्ये याचा निश्चित उपयोग होतो असा माझा गेल्या दहा वर्षांचा अनुभव आहे. अशी उदाहरणे मी अनेक देऊ शकेन. परंतु विस्तारभयास्तव त्यावर नियंत्रण ठेवणे इष्ट ठरते. शेवटी एक हृदयरोगाची केस उदाहरण म्हणून लिहितो.

  कर्नाटकातील एक वयस्कर स्त्री - वय सुमारे ६४-६५ ही हृदयरोगाने आजारी होती. (करोनरी हृदयरोग) त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये तुंबे आलेले होते. घरात सुद्धा फिरताना त्रास होऊ लागला होता. त्यांना बायपास करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यांच्या पतीला एका मित्राने माझेकडे येण्याचा सल्ला दिला. एवढा लांबचा प्रवास, माझे तीन जिने चढून येणे अशक्य होते. त्यांच्या पतीचा फोन आल्यावर त्यांना रुग्णाचा संपूर्ण इतिहास, तपासण्यांचे रिपोर्ट, सध्याची स्थिती व आजची परिस्थिती किती धोक्याची आहे वगैरे माहीती घेऊन येण्यास सांगितले. त्यांच्या सुदैवाने त्यांचे हृदयरोगतज्ज्ञ माणुसकी जपणारे होते. ते म्हणाले की बायपास महिन्याभराने केली तरी चालेल. डॉक्टरांना यांची मानसिक व आर्थिक परिस्थितीही माहीत होती. यावर त्यांना मी जप, ध्यानधारणा, आहार व योगाभ्यास ह्यांची तत्त्वे समजावून सांगितली व औषधेही लिहून दिली. ते गृहस्थ दरमहा डॉक्टरांचा रिपोर्ट घेऊन माझेकडे येत असत. रुग्णामध्ये हळूहळू पण निश्चित सुधारणा होती. त्यानुसार डॉक्टर त्यांना फिरणे, जिने चढणे याविषयी सल्ला देत असत व त्यांची औषधेही चालू होती. सात-आठ महिन्यांनी त्या बाई येथे पुण्यास आल्या. माझे घरी तीन जिने चढून आल्या. अर्थात हे सर्व त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच झाले. माझे औषधोपचार अर्थातच पूरक या स्वरूपातच होते. परंतु त्यांची बायपास टळली, न परवडणारा खर्च वाचला. अशा अनेक कहाण्या सांगता

११०