पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/११९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनापासूनची प्रार्थना व षड्रिपूंवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करावा. यासाठी स्वतःची इच्छाशक्ती व मनापासूनचे प्रयत्न उपयुक्त आहेत. आजकाल खरे गुरू हे सोने नव्हे तर प्लॅटिनमपेक्षाही जास्त दुर्मिळ झाले आहेत. आपण एकलव्याला गुरू मानून ‘एकला चलो रे' हा उपदेश मानावा व पाळावा. प्रेम, माया, त्याग ह्या मनाची पातळी वाढवत असतात. वैद्यकशास्त्राला ती पूरक आहेत व त्यापलीकडे जाऊन आपले जीवन निरामय करण्यास समर्थ आहेत. सारांशाने असे म्हणता येईल की वैद्यकशास्त्र अशा गोष्टी करत नाही. उलट "आज, आत्ता, या येथे जे प्रत्यक्ष अनुभवता येते, जे निरनिराळ्या चाचण्यांमधून कळते तेच सत्य" असे मानले जाते. तसेच वैद्यकशास्त्रच यावर औषधोपचार किंवा शल्यकर्म यावाटेच फक्त विकारमुक्ती देऊ शकते, हीही तितकीच अयोग्य धारणा, परंतु अनेक अनुभवांनी हे सिद्ध केले आहे की वैद्यकशास्त्राला आजही जाणीव नसलेल्या गोष्टी अस्तित्वात आहेत आणि वैद्यकशास्त्राकडून बऱ्या होऊ न शकणाऱ्या केसेस पूर्ण बऱ्या होऊ शकतात. आज बहुतांश लोक याला अंधश्रद्धा म्हणतात परंतु दिसते तसे असतेच असे नाही किंवा जे दिसत नाही, कळत नाही ते नसतेच असेही नाही.
  काही चमत्कार :
 विसाव्या शकतातही असे अनेक चमत्कार घडलेले आहेत जे विज्ञान वा व्यवहार बुद्ध यांना पटत नाहीत, समजत नाहीत. गोष्ट १९८१ सालातील आहे. जून २४ रोजी युगोस्लावियातील 'मेड्जुगोरजे' या गावी 'कुमारी मेरी' प्रगट झाली. त्या दिवसापासून ती दररोजच प्रगट होऊन लोकांना दर्शन देऊ लागली. ओघानेच त्या गावाला 'क्षेत्राचे' रूप येऊन लक्षावधी लोकांचा दर्शनासाठी पूर लोटला. तेथे शेकडो रुग्ण बरे झाल्याच्या वार्ता प्रसिद्ध झाल्या. तेथे एक फादर 'स्लावको' नावाचा फ्रेंन्सिस्कन ख्रिश्चन संन्यासी (Monk ) राहत होता. तो उच्चशिक्षित म्हणजे पीएच् .डी. होता. ही डिग्री मानसशास्त्रातील होती म्हणजे तो मानसशास्त्रज्ञ होता. तो म्हणतो की " मी कधी कधी कोण रोगमुक्त होईल हे सांगू शकतो. तेथे येणारे कृतनिश्चयी व श्रद्धा असलेले रुग्ण एकाच भावाने येऊन मेरीची रोगमुक्त करण्यासाठी प्रार्थना करत. ते तेथे स्वच्छ मनाने केवळ रोगमुक्तीसाठी मात्र आलेले नव्हते.'

"?

११८