पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हाडे खात होता. मे अखेर त्याच्या या गोळ्याची तपासणी (Biopsy) केली असता असे आढळले की हा 'फुसीफॉर्म' नावाचा कर्करोग होता. या प्रकारचा कर्करोग म्हणजे अतिशय आक्रमक व घातकी रोग समजला जातो. मायकेलीचा हा पाय एका प्लॅस्टर फ्रेमवर्कमध्ये टाकून जखडून टाकला होता. जूनमध्ये मायकेलीला दुसऱ्या केंद्रावर 'रेडिअम थेरपी' साठी परत पाठवण्यात आले. कारणे कळत नाहीत परंतु त्याला चार-पाच दिवसांतच डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी त्याचा पाय जणू शरीरापासून सुटून वेगळा व्हावयाची वेळ आलेली होती. पायाला कमरेपाशी आधारभूत भाग असतो तो म्हणजे हिप (Hip), पेल्व्हिस (Palvis), कूर्चा, स्नायुबंध, स्नायू या सर्वच गोष्टींचा नाश झाला होता. त्याच्या पहिल्या परीक्षेनंतर जवळ जवळ एक वर्षाने तो लूर्डस्ला गेला.
  लूर्डस्च्या मेडिकल कमिशननुसार मायकेलीची स्थिती त्या वेळी अतिशय गंभीर होती. त्याचे वजन खूपच कमी झाले होते, भूक नाहीशी झाली होती, तो काहीच खाऊ शकत नव्हता. त्याच्या पायाच्या प्लॅस्टर सकट त्याला त्या पवित्र पाण्यात . अनेक वेळा स्नान घातल्यावर त्याच्यात सुधारणा होऊ लागली. त्याला भूक लागू लागली व त्याला आपल्या शरीरात नवीन शक्ती निर्माण झाल्याचा अनुभव येऊ लागला. सुमारे एक महिन्याने तेथील डॉक्टरांनी त्याचे प्लॅस्टर काढले. एक्सरेमध्ये त्याचा गोळा लहान झालेला आढळला. काही आठवड्यांत हा कॅन्सरचा गोळा पूर्ण नष्ट झाला. आणि यापेक्षाही कल्पनातीत - विश्वास न बसण्यासारखी गोष्ट म्हणजे नाश पावलेली सर्व हाडे पुनर्निर्माण होऊन तो सर्व भागच पूर्ववत झाला होता.
 दोन महिने त्या पवित्र पाण्यात स्नान केल्यानंतर मायकेली बाहेर आपल्या पायांनी फिरावयास जाऊ लागला. या केसचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने स्पष्ट शब्दांत आपला निष्कर्ष काढला आहे. ते म्हणतात-

  "इलिॲक हाड, पेल्व्हिस या हाडांची पुनर्निर्मिती होऊन ती परत नैसर्गिक स्थितीत आली होती. १९६४, ६५, ६८ व ६९ या वर्षी परत परत तपासणी केली असता ही स्थिती कायम झालेली आढळली. गेली ४५ वर्षे ट्यूमरचा अभ्यास असलेले डॉक्टर्स, नवीनच अशा हाडांशी निगडीत ट्यूमर यांचा अभ्यास व अशा शेकडो केसेस हाताखालून गेलेले आम्ही डॉक्टर्स, आमच्या आयुष्यात अशी घडलेली घटना

१२०