पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आम्हास माहीत नाही." याचा अर्थ असा की ते सर्व डॉक्टर्स ही घटना पाहून आश्चर्याने थक्क झाले असावेत. ते पुढे म्हणतात - "मायकेलीच्या कॅन्सरबद्दल आम्ही निश्चित स्वरूपाचे कारण व तो पूर्ण बरा होण्यामागे काय वैज्ञानिक उत्तर असावे याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. तो कसलेही उपचार घेत नव्हता किंवा त्याला त्या काळात काहीही इतर रोगाची लागण झाली नव्हती. कधी कधी अशी लागण शरीराची शक्ती वाढवून - प्रेरणा देऊन कॅन्सर बरा करण्यास मदत करू शकते. अशक्य अशी पूर्ण नाश पावलेली हाडे व स्नायू यांची पुनर्निर्मिती होते, त्याचा हा अवयंव पूर्वी पूर्णपणे निरुपयोगी झालेला होता तरी हे घडू शकते, ह्याची प्रत्यक्ष प्रचीती येत आहे. हा रुग्ण आज जिवंत आहे आणि संपूर्ण निरोगी स्थितीत आहे. लूईस्वरून परत आल्यावर नऊ वर्षे ही स्थिती टिकली आहे."
  व्हिट्टोरिओची या सर्व कालखंडात मानसिक स्थिती काय होती? त्याला आपण बरे होऊ अशी खात्री होती का? अनेक प्रश्न आपलेसमोर उभे राहतात आणि त्यांना उत्तरे मात्र नाहीत. डॉ. जोनास साल्क यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रार्थना, भक्ती यांचे विकारमुक्तीतील कार्य हे वैद्यकशास्त्राला पूरक आहे. याचा अर्थ असा आहे की, मानव हा देह व मन या दोन घटकांचा बनलेला आहे व या दोन्ही घटकांना विकारमुक्तीसाठी उपचार आवश्यक आहेत. देहासाठी औषधे व मनासाठी प्रार्थनेसारखे उपचार ह्या द्वयीची जरुरी भासते. या सर्व कहाण्या पूर्णपणे सत्य असाव्यात यात काहीच संशय नाही. कारण त्या समाजात आदराचे व विश्वासाचे स्थान असलेल्या व्यक्तींनी लिहिलेल्या आहेत. अशा अनेक भारतीय कहाण्या पूर्वी घडून गेलेल्या आहेत. त्या सर्व सांगता येतील परंतु पाश्चात्य तज्ज्ञांनी त्याला वैज्ञानिक आधार शोधण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रयोग केले व ते लिखित स्वरूपात आज उपलब्ध आहेत. आपली मानसिकता मात्र गुलामगिरीची आहे. गोऱ्या लोकांनी सांगितलेल्या कहाण्यांवर आपण सहज विश्वास ठेवतो परंतु स्वकीयांच्या कहाण्या सांगितल्या तर त्यावर पुराणातील वांगी, भास, अंधश्रद्धा, अवैज्ञानिक असे शिक्के मारून त्यांना हास्यास्पद ठरवतो. डॉ. साल्क यांनी अध्यात्म हे वैद्यकशास्त्राला अत्यंत पूरक आहे, असा निष्कर्ष काढलेला आहे. तसा निष्कर्ष आपल्या

तत्त्वज्ञानातही मिळतो. आत्म्याचे ज्ञान व सिद्धी हे मिळवणे सोपे नाही. त्यासाठी,

१२१