पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जो मूलगामी समस्येवर कार्य करेल? ही खरी समस्या असते.
 आता कर्करोगाचा विचार करू. निरोगी शरीरात सातत्याने काही पेशी म्हणजेच अणू मृत होत असतात, त्याच अणूंची जणू नवीन प्रतिमा असे अणू निर्माण होतं असतात. या कार्यात जेव्हा अडथळा निर्माण होतो, सर्वसामान्य नैसर्गिक अणूंच्या तंतोतंत प्रतिकृतीऐवजी काही वेगळेच अणू निर्माण होतात, तेव्हाच ते घातक असतात व कर्करोग होतो. मधुमेहामध्ये इन्स्युलिनच्या अणूंची निर्मितीच खुंटते किंवा निर्मितीचे प्रमाण कमी होते किंवा ते अणू दोषयुक्त असतात. अवसादासारख्या (Depression) मानसरोगातही हेच घडत असते. योग्य भावभावना निर्माण होण्यास जे आवश्यक स्राव हवे असतात, त्यांच्या निर्मितीत किंवा नैसर्गिक गुणवत्तेत फरक पडत असतो. सर्व रोगांचे मूळ शेवटी या अणुबदलामध्ये किंवा नवनिर्मित अणूंच्या रचनेत सहज सापडते.
 आधुनिक विज्ञानानुसार रोग का होतो हे आपण पाहिले. रोगोत्पत्ती होण्यासाठी शरीराणूमध्ये बदल व्हावा लागतो. परंतु असा काहीही बदल न होता रोग होऊ शकतो का? हे अशक्य आहे हे वैज्ञानिक मत आहे. पण अशा गोष्टी अनेक वेळा घडून येत असतात. या अनाकलनीय विकारांना जेव्हा कारण माहीत नसते तेव्हा त्याला सामान्य लोक परमेश्वरी कोप, भानामती, भुताटकी अशी नावे देतात.प्रत्यक्षात एका मांत्रिकाने हे घडवून आणले असेही म्हटले जाते. पण त्याच मांत्रिकाला इतर अनेक माणसांवर हा प्रयोग जेव्हा करून दाखवता येत नाही, तेव्हा त्याला परमेश्वरी कृपा हा शब्द वापरला जातो. यामागे सत्य काय व कल्पना काय हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे व आपल्या विषयाशी निगडीत. आपण जिम कॉर्बेटने सांगितलेली बालासिंगची कहाणी पुढे पाहूच. त्याची शारीरिक स्थिती उत्तम होती.म्हणजे त्याचा प्रत्येक शरीराणू नैसर्गिक स्थितीत होता. परंतु त्रिशूळचा सैतान पोटात गेला ते त्याचे व इतरांचेही मत. आणि शेवटी त्यातच तो मृत्युमुखी पडला.अशीच 'व्हूडू' आफ्रिकन जादूटोण्याची कहाणी नंतर पाहू.आपण पाप केले आहे या कल्पनेनेच तो तरुण क्षणात मृत्युमुखी पडला.ह्याच्या बरोबर विरुद्ध झिजून मरणारा माणूस. उत्कृष्ट हॉस्पिटल, सुप्रसिद्ध डॉक्टर यांना याबाबत काहीही करता येत नाही. आणि तरीही तो बरा होऊ शकतो. अशी एक कहाणी अगदी आधुनिक काळातील व तीसुद्धा अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशातील. १२६