पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

आहे का? असा नियम किंवा सत्य म्हणून सांगितले जाते ते फक्त वरवरचे आहे का अंतिम आहे? व्यक्ती-व्यक्तीनुसार या प्रयोगांचे वेगळे निष्कर्ष निघणे शक्य आहे ACT ? प्रथम आपण थोडक्यात पाहू. सामान्यतः वैज्ञानिक काही निरीक्षणे, काही कल्पना, काही विचार यावर आधारित एक संकल्पना (Hypothesis) स्वतः पुढे ठेवतो. काही प्रयोग, काही निरीक्षणे व प्रत्यक्ष अभ्यास याद्वारा निष्कर्ष काढतो. हे निष्कर्ष जर मूळ संकल्पनेपेक्षा विपरीत असतील तर ती संकल्पना सोडून देऊन नवीन संकल्पना मांडतो किंवा मूळ संकल्पनेत बदल करतो. परंतु त्याचा नवीन अभ्यास सुरू होतो, प्रयोग चालू होतात. अशी ही साखळी. त्या वैज्ञानिकाला अपेक्षित निकाल मिळेपर्यंत असे प्रयोग चालू असतात. परंतु एका वैज्ञानिकाने काढलेला निष्कर्ष, तीच पद्धत, तीच निरीक्षणे, त्याच संकल्पना घेऊन निरनिराळ्या वैज्ञानिकांची तीच उत्तरे येतील असे नाही. अनेक वेळा एका वैज्ञानिकाने लिहून प्रसिद्ध केलेल्या संशोधननिबंधावर दुसरे संशोधक बरोबर उलट मत देतात. याला कारण व्यक्ती-व्यक्तीतील निरीक्षणे वेगळ्या दृष्टिकोनातून केलेली असतात. प्रत्येकाचे दृष्टिकोन, विचारांशी दिशा वेगवेगळी असते. तरीही पदार्थविज्ञानशास्त्रांत निश्चिततेचे प्रमाण बरेच असते. मात्र आज वैद्यकशास्त्रात हे नियम अजिबात लांगू पडत नाहीत. या क्षेत्रातील तज्ज्ञांची अशी एक दृढ धारणा आहे की शरीरात घडणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेचे मोजमाप करता येते. यामुळे पदार्थविज्ञानशास्त्रातील घडणाऱ्या प्रक्रिया व शरीरात घडणाऱ्या प्रक्रिया यांत काहीही फरक नाही आणि त्यांचा क्रम गणिती पद्धतीने मोजता येतो, ही संकल्पना कशी निर्माण झाली? शवविच्छेदन प्रक्रियेमधून मिळणारे ज्ञान हे पदार्थविज्ञानशास्त्रात चिकित्सेने मिळणाच्या ज्ञानाप्रमाणेच मिळत असते असे त्यात साम्य आहे. परंतु जिवंत मनुष्य व मृत मनुष्य यांच्या शरीराची जडणघडण जरी तीच असली; त्या शरीराचे निरनिराळे अवयव, निरनिराळी स्थाने यांची रासायनिक जडणघडण जरी एक असली तरीही प्रत्येक व्यक्ती ही अगदी स्वतंत्र असते. मनुष्याच्या हाताचे जर ठसे घेतले तर त्यावरील प्रत्येकाच्या रेषांच्या जाळ्याच्या आकृती वेगवेगळ्या असतात. लाखो लोकांतही दोन व्यक्ती अगदी एकाच ठशाच्या सापडणार नाहीत. तसेच प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी, स्वभावधर्म वेगळे, वर्तणूक प्रतिसादही वेगळे असतात. ह्याचा विचार आयुर्वेदाने व होमिओपॅथीने निश्चित केला आहे. पण यातूनही १२९