पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 (१) वसंत - फाल्गुन - चैत्र - थंडी संपून उन्हाळा सुरू
 (२) ग्रीष्म - वैशाख - ज्येष्ठ पूर्ण तीव्र उन्हाळा
 (३) वर्षा - आषाढ-श्रावण - पावसाळा
 (४) शरद - भाद्रपद - आश्विन - पाऊस कमी व शेवटी बंद. थंडीची चाहूल
 (५) हेमंत कार्तिक - मार्गशीर्ष - थंडी
 (६) शिशिर पौष माघ - थंडीचा शेवट. उन्हाळा सुरुवात
 असे हे कालचक्र. निरीक्षण व अनुभव यांतून ह्या चक्राची निश्चिती करण्यात आली. "नेमेचि येतो मग पावसाळा - हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा" या कवितेत कवी नित्यनेमाच्या चक्राचे वर्णन करतो व सृष्टीचा कौतुकाने व आदराने उल्लेख करतो.
 आदिम काळात सुद्धा त्या आदिवासी लोकांना काहीही शिक्षण नसताना हे कालचक्र माहीत असे. पशुपक्ष्यांनाही हे चक्र माहीत असते. थंडीच्या कालाचे आगमनाची चाहूल लागली की शीतखंडातील प्राणी स्थलांतर करून सौम्य हवामान व सहज अन्नपुरवठा होणाऱ्या भागाकडे जातात. पक्षी तर हजारो मैल प्रवास करून भारत, पाकिस्तान अशा समशीतोष्ण देशांत येतात. वृक्षांची पानझड होते. याचा अर्थ असा की सर्व जीव सृष्टीचा हा 'चक्रनेमिक्रम' जाणतात. थंड प्रदेशाचीच गोष्ट कशाला, आफ्रिका खंडात अतिशय उन्हाळ्यात जेव्हा जंगल रुक्ष होते, खावयास अन्न व पिण्यास पाणी अप्राप्य होत जाते तेव्हा अनेक प्राणी स्थलांतर करतात. जे करत नाहीत ते मृत्युमुखी पडतात. आदिम 'होपी इंडियन' जमातीच्या भाषेत भूत, वर्तमान, भविष्य दर्शवणारी क्रियापदेच नाहीत. तरीही ते ज्या काटेकोरपणे सृष्टिचक्र जाणतात ते पाहून सुशिक्षितांनाही आश्चर्य वाटले होते.
 हे काळाचे चक्र निश्चितपणे जाणून घेण्याचे अनेक मार्ग मनुष्याने शोधून काढले. सूर्याची उन्हे कशी पडतात, सूर्य केव्हा उगवतो व मावळतो, आपले घटिकापात्र, वाळूचे घड्याळ, आजही आश्चर्य वाटावे असे दिवसाच्या कालखंडाचे भाग सांगणारे जंतरमंतर, अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. काही शिकारी तर दोन हातांचा १३५-