पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोरडे ओढण्याची रीत होती. आदिवासी लोक निसर्गाचे घड्याळ समजावून घेत,त्याप्रमाणे आपला दिनक्रम व संवत्सरक्रम आखत, तो पाळत. कारण त्या वेळी कृत्रिम घड्याळांचा जन्म झाला नव्हता. तरीही वेळ मोजण्याची त्यांची स्वतःची नैसर्गिक साधने होतीच. उलट ह्या आधुनिक साधनांमुळे आपण सुखी होण्याऐवजी आपले ताणतणाव वाढलेच आहेत. घड्याळ जरूर पण गुलामगिरी नको. निसर्गापासून दूर जाणे नको. खरे म्हणजे काल मोजण्याचे हे साधन म्हणजे त्याि जीवन जगणे कठीण अशी काही गोष्ट नाही. आपण पाहतो की आज प्रत्येकाजवळ मनगटी घड्याळ आहे. परंतु ते जरुरीपेक्षा अलंकारच झाले आहे. थंडीत अंगावर स्वेटर नसला तरी चालेल पण घड्याळ पाहिजेच. याचा अर्थ आपण नको एवढे घड्याळाचे गुलाम झाल्यामुळे आपली दुःखे, आपले विकार वाढलेलेच आहेत. कारण सातत्याने वेळेकडे लक्ष दिल्यामुळे ताणतणाव येतच असतात. आणि तेच मूलतः विकारांचे कारण आहेत.
आदिम काळ व आधुनिक काळ :
 आदिम काळी मानव कोणती गोष्ट वा वस्तूचे सत्य अस्तित्व समजत असे ? मूळ गोष्ट परत परत घडणे किंवा तिचे प्रतिबिंब असलेली गोष्ट अस्तित्वात असणे ही सत्याची कसोटी. आदिम मानव सत्य प्रत्यक्ष अस्तित्वात होता कारण तसेच अनेक मानव अस्तित्वात होते, तो दुसरा मानवच होता अशी त्यांची धारणा होती. त्याला आपले अस्तित्व विसरून जणू आपली प्रतिबिंबाकृती म्हणून दुसरा मानव दिसत असेल तरच तो सत्यरूपात आहे, आपण आपल्या पूर्वजांचे प्रतिबिंब आहोत, हा आपला पुनर्जन्मच आहे असे तो मानत असे. यामुळे त्याच्या अनेक गोष्टी - ज्या काळाशी संबंधित आहेत किंवा होत्या म्हणून त्या परत परत तशाच घडत असतील तर काळ या संज्ञेचा त्याच्या दृष्टिकोनातून अर्थच उरत नसे. त्याचे जीवन, हालचाली ह्या पूर्वीप्रमाणे म्हणजे प्रदीर्घ भूतकाळापासून चालू असतील, या जीवनात घडणाऱ्या घटना परत परत सतत घडत असतील तर तेथे भूतकाळ हा शब्दच नाही. त्या प्रत्येक घटनेला लागणारा काळ हा क्षणभंगूर व अल्पकालीन नसून तो पूर्णतः चालू वर्तमान असतो, त्यामुळे काळाची संकल्पनाच वेगळी ठरते. पूर्वजांचेच जीवन तो जगत असल्यामुळे तो पूर्वजच मी आहे ही भावना निर्माण झाली असावी. जन्म, जीवन व मृत्यू यांचे अशा कल्पनांनी अस्तित्वच नष्ट होते. जीवन म्हणजे कधीही - १३८ B