पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाणवते. वास्तविक आपला देह हे एक घड्याळच आहे. याला अंतरीचा ताल आहे, कालगणना आहे. या सर्व गोष्टींमुळेच जेव्हा आपण सातत्याने किंवा प्रामुख्याने फक्त आरोग्याचा विचार करतो, तेव्हा पुढे येणारे वार्धक्य व मृत्यू यांचाच रात्रंदिवस नकळत विचार करत असतो. खरे म्हणजे आपले शरीर स्वतःच कालगणना करत असते. शरीराच्या सर्व प्रकारच्या हळूहळू होणान्या -हासाची लक्षणे म्हणजेच निश्चित काल. हा -हास अटळ आहे. यासाठी मनाने त्याची जाणीव सतत करून घेण्याची काहीच जरुरी नसते. येथे अध्यात्म उपयोगी पडते. कोऽहं- मी कोण? या प्रश्नाला उत्तर आदिम काळापासून अस्तित्वात असलेला मानव, त्याच मानवाचे प्रतिरूप, प्रतिकृती. जीवन म्हणजे काय ? याच्या कालखंडाची व्याख्या काय? असा कालखंड मोजणे हेच अनैसर्गिक आहे. जन्म आणि मृत्यूही नसल्यामुळे मी. विश्वाच्या जन्मापासून आहे व आतापर्यंत राहणार आहे. यालाच आध्यात्मिक रूपात रहाटगाडगे म्हटले आहे. तेच पोहरे, खाली जाणारेही तेच, वर येणारेही तेच. जन्मही तोच पुनर्जन्मही तोच. यामुळे निरागस बालकांची मने ही सर्वोच्च स्थिती. आपण मनाने बालक व ज्ञानाने वृद्ध होऊया.
आधुनिक कालखंडाचे काही खास पैलू :
 आधिभौतिक विश्वाचा विचार केला तर त्याला भूतकाळ नाही, वर्तमान नाही व भविष्यकाळही नाही. ते कालप्रवाहात नाही. त्यामुळे त्याच्याबाबत काळ स्थिर आहे किंवा अस्तित्वातच नाही. काळ ही मानवाने निर्माण केलेली एक संकल्पना. याची व्याख्या काय? काळ कसा मोजावयाचा? त्याला तसे भौतिक भोजमाप नाही, पण मानवाने आपल्या सोयीसाठी अनेक संकल्पना मांडल्या, त्यांतील एक कालमापनाची पद्धत. काळ म्हणजे काय ? त्याची सोपी व्याख्या म्हणजे एखादी घटना घडून जाणे ही त्याची जरुरी. दोन घटनांमधील अंतर म्हणजे कालमान. एक घटना घडून पूर्ण झालेली आहे व नंतरची घटना घडू लागली आहे. ती पूर्ण होते तेव्हा ती दुसरी घटना झाली. असा घडलेल्या दोन घटनांमधील वेळेचे अंतर, किंवा घटना घडू लागण्यापासून ती पूर्ण होईपर्यंतचा काळ हा कालमापनाचा पाया झाला. घड्याळे आल्यावर असा काळ आपण सेकंद, मिनिटे, दिवस यांत मोजू लागलो. समजा, आपण एखादी योजना हाती घेतली. ती योजना कालबद्धपणे कशी पार पाडावयाची यासाठी काळ व खर्च यावर आधारित आराखडा तयार करावा लागेल.


१४०