पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एखाद्या इमारतीसाठी पायाखोदाई ही सुरुवात असते. परंतु आराखडा आखताना पहिली घटना म्हणजे सुरुवात. तिला काळ लागत नाही. त्यानंतर खोदाई सुरू होते. ही पूर्ण होण्यास काळ लागणे हे साहजिकच. परंतु हा कार्यकाल किती हे आराखड्यासाठी निश्चित केले जाते व नंतर सुरुवात व अंत यांच्या प्रत्यक्ष तारखा घातल्या जातात. अशा रीतीने संपूर्ण योजनेचे भाग पाडून त्यांची सुरुवात व अंत दाखविणे म्हणजे योजनेचा आराखडा. यात अर्थातच त्या कालखंडात किती खर्च होणार हेही योजावे लागते. अर्थात हे कार्य दिसते तितके सोपे नाही. हल्ली कॉम्प्युटर- मुळे अर्थातच ते सोपे झाले आहे. परंतु प्रत्येक अपेक्षित घटनेच्या कार्यकालात लागणारा पैसा, सामान, कामगार या सर्वांचा अंदाज घ्यावा लागतो.

           वेळ          वेळ         वेळ

सुरुवात १---------------२----------------३----------------४ शेवट इत्यादी

           खर्च          खर्च         खर्च 

 सुरुवातीची घटना खोदाई पाया भिंतीचे बांधकाम अर्थात ह्या सर्व गोष्टी अंदाजे असतात.पुष्कळ वेळा अनेक कारणांमुळे असे अंदाज चुकतात. केलेले काम होत नाही.घटनेचा काळ पुढे ढकलला जातो. जास्त खोलात न जाता आपणास एवढी कल्पना सहज येते की (१) घटना पूर्ण होण्यासाठी काही काळ लागता, (२) पहिली घटना संपते व त्याच दिवशी पुढल्या घटनेचा कार्यकाल सुरू होतो.काळ मोजावयाचे साधन म्हणजे घटनांमधील अंतर.जीवनाचे एकही अंग असे नाही की ज्यात घटनाच घडली नाही म्हणून त्यांचा कालखंड एखाद्या प्रवाहासारखा असतो.समजा एखादा रुग्ण बेशुद्धावस्थेत काही महिने होता.त्याच्या स्वतःच्या दृष्टीने हा असा काळ अस्तित्वातच नसतो.परंतु इतर म्हणतात हा रुग्ण वीस दिवस बेशुद्धावस्थेत होता.हा कालखंड कसा मोजला? ज्या दिवशी तो बेशुद्ध झाला व ज्या दिवशी तो शुद्धीवर आला या दोन घटनांमधील काळाचे अंतर म्हणजे तो किती दिवस भानरहित होता ते दर्शवणारा कालखंड.आदिम लोकांचे दृष्टीने हा थांबलेला काळ.हा दृष्टिकोनातील फरक.तोच तुमचे मनही ग्रहण करत असते.

 आधुनिक विज्ञानानुसार आपल्याला मिळणारे ज्ञान हे इंद्रियांच्या अनुभवातून मिळालेले असते. यातूनच आपण त्या गोष्टीची सत्याकृती निर्माण करतो. अशी ही आकृती पूर्णसत्य असेलच असे नाही. नेमके हेच आपण विसरतो. या विश्वामध्ये



१४१