पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घडणाऱ्या घडामोडी, त्यांचे सत्यस्वरूप काय आहे हे आपल्याला खन्या अर्थाने नीट माहीत नसते. तरीसुद्धा त्यांना आपण वर्ष, महिना, दिवस, तास अशा प्रत्यक्षात नसलेल्या परंतु आपण आपल्या सोयीसाठी निर्माण केलेल्या काळाच्या प्रवाहात बसवत असतो.

 ह्या दृष्टिकोनातून आपण आजचे जीवन व आरोग्य यांचा विचार करू. प्रत्येक मनुष्य आपल्या आरोग्याविषयी काही संकल्पना गृहीत धरत असतो. परंतु त्याचे स्पष्ट चित्र त्याला एक तर माहीत नसते किंवा ते तो कधीच रेखाटत नाही. असे आपण केले तर आपल्याला काय दिसेल? "माझे शरीराला एक अस्तित्व आहे, ते एक वस्तू आहे. या विश्वात त्याला एक स्थान आहे. तो मी आहे, इतर कोणीही नाही. म्हणजेच मी इतरांपेक्षा वेगळा, स्वतंत्र व परिपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे." हे शरीर म्हणजे एक वस्तुमान, एक घटक, ते अणूंचे तयार झालेले आहे व शरीराच्या इमारतीचे तेच निरनिराळे भाग तयार करतात. हात, पाय, डोके, निरनिराळ्या शरीरसंस्था म्हणजे हे अणू व त्यांच्याच एकत्र येण्यामुळे, ठराविक कार्यामुळे 'जीवन' ही चीज निर्माण झाली आहे. या जीवनाला एक निश्चित कालखंड आहे व जीवन संपले, मृत्यू झाला की तो देह आणि त्याच्या अस्तित्वाचा काळ, त्याची विश्वातील जागा या सर्व गोष्टींचा अंत होत असतो. हा जो मी असतो त्याचे अस्तित्व जन्माने सुरू होते, मृत्यूने त्याचा अंत होतो. याला भूतकाळ असतो, वर्तमानकाळ असतो व भविष्यकाळही असतो. हा जीवनाचा कालप्रवाह जसजसा पुढे जात असतो,तसतसा तेवढा कालखंड भूतकाळ बनतो. या जीवनात येणारी व अटळ गोष्ट म्हणजे रोगग्रस्तता, विकार. विकार हा शरीरसंस्थेशी निगडीत असतो, आरोग्य आणि विकार या दोन्ही गोष्टी देहाशी निगडीत आहेत आणि त्या जीवनाच्या कालखंडात घडणाऱ्या आहेत. विकाराप्रमाणेच आरोग्यही आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे इष्ट ठरेल. जीवन ही एकदाच येणारी गोष्ट. मृत्यू म्हणजे त्याचा अंत. वैद्यकशास्त्राचे ध्येय रोग दूर करून हा जीवनाचा कालखंड वाढवणे, मृत्यू पुढेपुढे ढकलणे, हेच आहे असे समजले जाते. पण हे सर्व सतराव्या शतकातील विज्ञानावर आधारित आहे, तेव्हा विज्ञानाने त्याला आजच्या संकल्पनेचे रूप दिले आहे. पण हे अंतिम सत्य आहे का? हे विचारही बदलत गेलेले आहेतच. यामुळे आरोग्याच्या संकल्पनाही बदलत गेलेल्या दिसतात. आरोग्यसुद्धा पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट आहे, त्याचा इतरांशी



१४२