पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनुष्याचे जीवनच गुणवत्ताहीन करण्याचा हा प्रयत्न. जीवाणू, विषाणू वगैरे जीव बाहेरून शरीरात येऊन विकार निर्माण करतात ही ती आधुनिक श्रद्धा. शिवाय हा दृष्टिकोन म्हणजे विशिष्ट विकाराला एक विशिष्ट कारण असते हे गृहीत. या संबंधात अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलच्या १९८० अंकात 'एरिच जानत्व' म्हणतो,
 “मृत्यू होण्यासाठी जी आकस्मिक आपत्ती येत असते तिच्यासंबंधी सर्वसाधारण कल्पना म्हणजे एकाद्या त्रिकोणी भिंगातून (Prism) दृष्टीला दिसणारे चित्र पाहणे आहे. यामुळे जशा एखाद्या वस्तूच्या निरनिराळ्या आकृत्या समोर येतात तशीच वेगवेगळी चित्रे विकारांची येऊ लागली. चित्र बदलले की विकारांच्या उपचारांतही बदल घडवावा लागतो. विकार म्हणजे मानव हा या विश्वाची प्रतिकृती, तिच्या आत आणखी एक सूक्ष्म जगत् असते, यातील झालेला बिघाड, नवनवीन इलेक्ट्रॉनिक यंत्रांमुळे व इतर सुधारित यंत्रांमुळे उलट मनुष्याच्या मृत्यूचे ज्ञान मिळवणे आणखीनच कठीण झाले आहे. कारण व परिणाम यांची जी पूर्वी सरळ कल्पना होती ती अनंत वळणावळणाची तयार झाली. हे बदल म्हणजे शरीरांतर्गत समतोल राखण्याची जी क्रिया असते, यासंबंधी ज्ञान मिळविण्याची जी बौद्धिक शक्ती असते तीच उपयोगात आणणे बंद झाले. म्हणजे आमची विचारशक्ती, बुद्धिवाद, कार्यकारणभाव समजण्याची कुवत ही वापरणेच बंद होऊन आपण आधुनिक यंत्रांचे गुलाम झालो आहोत. "
 पूर्वीची आपली धारणा होती की सूक्ष जीवाणूंची शक्ती व शरीराची प्रतिकारशक्ती ही जर समप्रमाणात असेल तर विकार कधीच उद्भवणार नाहीत. याविषयी डॉ. केंट या जुन्या काळातील प्रसिद्ध होमिओपॅथने एक समीकरण मांडले होते ते अतिशय प्रसिद्ध आहे.


 या स्थितीत विकार कधीच उद्भवत नाहीत. आणि झाले तरी लवकर बरे होतील. आता प्रतिकारशक्ती कमी असते व औषध दिले नाही तर रोगाचा दुष्परिणाम अटळ ठरतो. समजा, याच्या उलट झाले तर ती औषधाची शक्ती शरीरालाच अपाय करेल, हे डॉ. केंटने सुमारे सत्तर- पंचाहत्तर वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले तत्त्व आपण पूर्ण विसरलेले आहोत. शरीराची स्वतःची अशी एक रचना आहे की त्यामुळे

१४५