पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिकलो ती करुणा यांचा संगम जेव्हा घडतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात, हा माझा अनुभव आहे. ते आनंददायी क्षण अनेक वेळा आलेले आहेत. यामुळे मी खरा त्या रुग्णांचाच कृतज्ञ आहे. तेव्हा 'मा कश्चित् दुःख भाग भवेत्' एवढी प्रार्थना करतो.

 पुढे दिलेल्या, विश्वास न वाटणाच्या अशा साक्षात्कारी घटना या पूर्ण सत्य आहेत. त्या आपल्याही विकारमुक्तीच्या यज्ञात घडाव्यात अशी इच्छा असल्यास तेवढे कष्ट श्रद्धेने झाले पाहिजेत. ह्या गोष्टी निश्चित साध्य आहेत, पण त्यासाठी अपरंपार कष्टांची/प्रदीर्घ तपश्चर्येची जरुरी आहे.



पु. स. गोरे


बी - २, प्रबोधन को-ऑप. सोसायटी,


६१ / ९ व १०, प्रबोधन पथ, एरंडवणे,


पुणे : ४११००४.


फोन : ५४६०८२३


१३