पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पातळीसुद्धा बदलते, खाली येते एवढे नाही तर रक्तातील हार्मोन्स (जसे कॉर्टिसॉल अथवा हायड्रोकॉर्टिसोन) यांचे वाढलेले अस्तित्व वा अस्तित्वाची वाढलेली पातळी खाली आणते. उदाहरणार्थ, समजा, दिवाळीत किंवा मॅच जिंकल्यावर काहीजण फटाके उडवतात, तसा एखादा अॅटमबाँब जवळपास फुटला तर आपण भीतीने दचकतो, मनावर खूप ताण येतो, हृदयाचे ठोके वाढतात, रक्तात ॲड्रेनलिनची पातळी एकदम उच्च होते. पण नंतर काय आहे ते कळल्यावर नाडीचे ठोके हळूहळू नेहमीच्या पातळीवर येतात. पण सततच्या ताणतणावामधून जर हे होणार असेल तर ते आरोग्याला मारक ठरते. हृदयविकारच नव्हे तर कर्करोगाचीही उत्पत्ती होऊ शकते.
 मानव आपणच स्वतःचा साहाय्यकर्ता म्हणा किंवा माध्यम म्हणा (Human Factor) होतो ते फक्त ध्यानधारणेमुळे नाही तर त्याला इतरही अनेक घटक कारणीभूत असतात. हृदयशूल (Angina Pectoris) हा सौम्य किंवा तीव्र असू शकतो. कधी कधी तर तो रुग्ण पूर्ण निःशक्त होऊ शकतो. मेडाली आणि गोल्डबर्ट या दोघांनी १०,००० इस्रायली पुरुषांचे बाबत हृदयशूलाचा, त्याच्या प्रत्याघाताचा अभ्यास केला. हे सर्व पुरुष चाळिशीच्या वरचे होते. त्यांना असे आढळून आले की हृदयविकार होण्याची जी कारणे नेहमी सांगितली जातात त्याव्यतिरिक्त इतरही काही महत्त्वाचे घटक आहेत. नेहमीची कारणे म्हणून धूम्रपान, रक्तातील कोलेस्टरॉलची वाढ, मानसिक ताणतणाव वगैरे वगैरे. या सर्व गोष्टी समान असूनही काही व्यक्तींना हृदयशूलाचा आघात तीव्र असतो तर काही जणांना सौम्य. यात लक्षात न घेतलेली गोष्ट म्हणजे कामाच्या ताणतणावाव्यतिरिक्त त्यातील ज्यांना आपल्या पत्नीचे, कुटुंबाचे भरपूर प्रेम मिळत असे, ज्यांच्या पत्नी त्यांच्या सुख-दुःखाच्या वाटेकरी होत्या, त्यांना येणाऱ्या आघाताचे प्रमाण हे अशा प्रेमापासून वंचित झालेल्या पुरुषांच्या मानाने फक्त ५० टक्के होते. प्रेम मिळालेले ससे व निर्व्याज प्रेम मिळणारे पुरुष यांत तत्त्वतः काहीही फरक नव्हता व नाही. इंग्लंडमध्ये ब्राऊन व त्यांचे सहकारी यांनी मानसविकारांच्या कारणांचा अभ्यास केला असता त्यांना असे आढळले की -
 “मनोविकारापासून संरक्षण देणारा अतिशक्तिमान घटक म्हणजे पत्नीचे प्रेम.' हे प्रेम म्हणजे नुसती लैंगिक ओढ नव्हे. भले त्यांच्यांत महिनोन् महिने लैंगिकं संबंध असोत वा नसतो. असेच प्रेम जर मित्रांकडून मिळाले तरीही त्याचा असाच १५१