पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हेही निरोगी जीवनाचे अतूट अंग आहे. हे जेव्हा तुटतात, मनुष्य एकाकी पडतो किंवा स्वेच्छेने एकटेपणा पत्करतो तेव्हा ते गंभीर आजार व अंती मृत्यूला निमंत्रण ठरते. आपण सामान्यतः असे गृहीत धरतो की आपला देह हा मृत्यू येईपर्यंत जशाचा तसा राहतो. आपली अशीही धारणा असते की ह्या जीवनाच्या कालखंडात या देहात मूलभूत असा काहीही फरक पडत नाही. परंतु मृत्यू होताच शरीराची कुजण्याची - नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू होऊन त्याचे मूलभूत घटक मातीशी एकरूप होतात.
 “माती असशी मातीशी मिळशी" किंवा
 "माटी कहे कुम्हार को तू क्या
 इक दिन ऐसा आयेगा, मैं रौंदूंगी तोहे ॥" - कबीर

अशी अनेक वचने आपल्या संतवाङ्मयात मिळतात. त्याचाच हा परिणाम असावा का? पण त्यांचे संदर्भ वेगळे आहेत. सत्यात जसे डी. एन्. ए. ह्यांची बदली एका प्राण्यातून दुसऱ्या प्राण्यात विषाणूंमुळे होत असते, तसेच आपला प्रत्येक अणुरेणू शरीर सोडून जात असतो व कदाचित दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करत असतो. 'मर्ची' या वैज्ञानिकाने याला एक मार्मिक उदाहरण दिलेले आहे. तो म्हणतो, “तुम्हाला हे माहीत आहे का? की आपण जो प्रत्येक श्वास घेत असतो त्यात दहा सेक्स्टिलिअन अणू असतात. (एक सेक्स्टिलिअन म्हणजे संख्येमध्ये १०९) या पृथ्वीभोवतालच्या अफाट वातावरणात एवढेच म्हणजे १०९ एवढे श्वासाएवढे श्वास सहज आहेत आणि प्रत्येक श्वास म्हणजे पृथ्वीभोवतालच्या श्वाससंख्येपैकी एक सूक्ष्म अणू असतो. म्हणजे या संपूर्ण अवकाशाचाच एक अणू म्हणजे प्रतीकरूपाने अवकाशच आत घेत असतो." त्याचे हे विवरण बरेच लांब आहे पण त्याचा मथितार्थ असा की, मानवाप्रमाणे ह्या आपल्या छोट्या पृथ्वीवर अब्जावधी जीव सतत श्वास घेत असतात व सोडत असतात. तेव्हा आपण सर्व जीवमात्र अपवादरहित या विश्वाच्या खेळातील सोंगट्या आहोत, असे जे आपल्या तत्त्वज्ञानात म्हटले जाते. त्याला हा आधारच आहे. अर्थात सोंगट्या याचा अर्थ ईश्वरेच्छेप्रमाणे चालणारे जीव .

१६०