पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 याला निरनिराळ्या प्राणीमात्रांचे सहजीवन असेही म्हणता येईल. याला इंग्रजी शब्द 'सिम्बायोसिस' (Symbiosis) असा आहे. आजच्या आधुनिक युगात एका अर्थाने सर्व जगच आकसून लहान झाले आहे. याला कारण म्हणजे अल्पकाळात प्रवास, क्षणार्धात लिखित व शाब्दिक संपर्क जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे साधता येणे, ह्या गोष्टी आहे. 'हे विश्वचि माझे घर', विनोबांची 'जय जगत्' ही घोषणा, कै. साने गुरुजींची 'आंतर भारती' ह्या संकल्पना मागे अखिल विश्वातील मानवांचे सहजीवनाची संकल्पना आहे. "सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात् ।। ” ही प्रार्थना आपण हजारो वर्षे करत आलो आहोत. परंतु प्रत्यक्षात धनदांडगी राष्ट्रे किंवा लष्करशाही या गोष्टी आपल्या सहजीवनातील फार मोठे अडथळे आहेत. "जीवो जीवस्य जीवनम् ।" ही उक्ती म्हणजे निसर्गनिर्मित प्राण्यांच्या संख्येवरती नियंत्रण ठेवणे एवढाच अर्थ घ्यावा लागेल. बाघ, सिंह, रानकुत्रे आदी मांसाहारी प्राणी भूक लागली तरच शिकार करतात. इतर सर्व प्राणी सहजीवन जगत असतात. मांसाहारी प्राणीसुद्धा यांना व स्वतः ला सहजीवन जगू देतात. मानव याला अपवाद का? तो मानवजातीला व इतरांनाही सहजीवन उपभोगू देत नाही. परंतु त्याची पेशी आणि पेशी व्यक्तीपुरतेच नव्हे तर वैश्विक सहजीवन जगत असते, एकमेकांना मदत करत असते, त्यांच्याकडून मदत घेत असते हे तर विज्ञानाद्वाराही सिद्ध झाले आहे, व अध्यात्मामध्ये तो एक महत्त्वाचा भाग मानला गेला आहे.

 आधुनिक वैद्यकशास्त्राने या मानवाचे दोन स्वतंत्र भागांत विभाजन केले आहे. (१) देह व (२) मन. शरीर म्हणजे एक जिवंत यंत्र, ज्याची यंत्रवत झीज व मोडतोड होत असते व ती दुरुस्ती करण्याचे साधन म्हणजे उपचार. आणि आपला देह हा रासायनिक तत्त्वांचा बनलेला असून त्वचेच्या जणू पिशवीमध्ये भरलेला आहे असा दृष्टिकोन असतो. परंतु मन मात्र असे आहे की त्याला विचार करण्याची शक्ती आहे, जे अध्यात्म जाणू शकते असे या पिशवीतच वास्तव्य करत आहे, हे आपण पाहिलेले आहे. परंतु अशा विचारसरणीची निर्मिती कशी झाली? याचा उगम देकार्तच्या विचारसरणीत आढळतो. तो म्हणतो -

 "मला, याचा तुम्ही असा विचार करावा, असे वाटते की देह हा यंत्र आहे. पचन, पोषण, श्सोच्छ्वास, निद्रा व जागृती, उजेड, आवाज, निरनिराळे वास,

१६१