पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


अणू घेत असतात. याचा अर्थ ते सर्व प्राणी एकमेकांशी व मानवाशी रासायनिक संपर्काची एक साखळी निर्माण करत असतात. हे अगदी अनादी कालापासून चालू आहे. आपल्याला त्याची जाणीव नसते एवढेच. याला मानवाचा अनुभव व जाणीव यांचा काही आधार देता येतो का ? ईश्वराशी नाते जोडू इच्छिणारे, आत्मज्ञान लाभलेले ऋषिमुनी, ज्याला आपण अंतर्ज्ञान म्हणतो, त्या विद्येने इतरांना ते सर्वांगांनी जाणू शकत असत, माणसामाणसातील एकता एवढेच नव्हे तर सर्वच प्राणीमात्रांतील आत्म्याची एकरूपता ते पूर्णपणे जाणून होते. अशी वर्णने आपल्याला प्राचीन वाङ्मयात आढळतात की हे आश्रमवासी कोणाही प्राण्याला आपल्याजवळ बोलावू शकत, वाघ-सिंहासारखे प्राणी आपली क्षमता व आपली वृत्ती विसरून तेथे जात असत. हरणे, ससे असे शाकाहारी प्राणी आश्रमाभोवताली सहज वावरत असत. सर्वसामान्यपणे प्रत्येक वनचर त्यांत वाघ, सिंह, हत्ती सारखे प्राणी आले, हे माणसांपासून दूर पळून जातात. पण त्या आश्रमात मात्र वेगळी स्थिती असे. तेथे येणान्या सर्व वनचरांचे या ऋषिमुनींशी प्रेमाचे संबंध जडत. त्यांच्यात बंधुभाव व सहजीवनाची ओढ असे. आजही जंगलात, चितळ, सांबर यासारखे प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी मानवाकडे धावत आल्याच्या अनेक कहाण्या आहेत. बंडीपूर किंवा तत्सम जंगलातील बंगल्याभोवती शेकडो हरणे दहा-पंधरा फुटांवर रात्री बसून राहतात. माणूस बाहेर आला तरी हळूहळू दूर जातात. घाबरून पळत सुटत नाहीत. जंगली कुत्री कळपाने शिकार करतात. कुत्री धावता धावता सुद्धा त्यांच्या सावजाचे तुकडे तोडतात. वाघसुद्धा यांना घाबरतात. पूर्वी शिकारी लोक जंगलात तंबू ठोकून कित्येक दिवस मुक्काम करत. एकदा शिकारी कुत्री मागे लागलेले एक सांबर धावत धावत येऊन एका तंबूमध्ये जाऊन थरथरत उभे राहिले. ती कुत्री शिकाऱ्यांच्या मुक्कामाभोवती सांबर बाहेर येण्याची वाट पाहत बसून राहिली. त्या शिकाऱ्यांनी हे पाहताच त्या कुत्र्यांना पिटाळून लावले. गोळीबारात काही कुत्री मरणही पावली. रान मोकळे होताच एक शिकारी तंबूत येऊन त्या सांबराला हाकलू लागला. सांबर जागचे हलेना. तेव्हा तो शिकारी आपण गाय, बैल या पाळीव प्राण्यांना जसे हवे तेथे ओढून नेतो, तसे त्या सांबरास बाहेर घेऊन गेला व त्याच्या पाठीवर एक दोन रट्टे देऊन त्यास हाकलून दिले. येथे माणसाची करुणा व जंगली प्राण्यांनाही वाटणारा मानवाचा आधार ह्या गोष्टी सहजीवनाच्या इच्छेच्याच

१६३