पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

द्योतक आहेत हे कळते. हे झाले शाकाहारी प्राण्यांचे. पण अगदी ढाण्या वाघासारखे मांसाहारी प्राणीसुद्धा अडचणीच्या काळात मानवाचा आधार शोधतात. एक कहाणीच पाहूया. एका जंगलातील निवासी बंगल्यामध्ये एका भागात एक अधिकारी आपल्या सेवकांसह राहत होता. दुसरा भाग रिकामा होता. एका रात्री एक जखमी वाघ त्या खोलीत येऊन बसला. त्याच्या जखमा अशा ठिकाणी होत्या की त्या त्याला जिभेने साफच करता येत नसल्यामुळे त्या चिघळल्या होत्या. एक सेवक आत गेला. अंधारात प्रथम त्याला वाघ दिसला नाही. दोन-तीन फूट अंतरावरून मात्र वाघ दिसला. सेवकाने घाबरून बाहेर धाव घेतली व दाराला कडी लावून घेतली. वाघाने काहीही अगदी साधा आवाजही केला नव्हता. तो स्वस्थ बसून होता. त्या अधिकाऱ्याने त्याला गोळ्या घालून ठार मारले, त्या वेळीही वाघाने गुपचुप मृत्यू पत्करला. याचा अर्थ एकच, प्राणीजगतात खऱ्या अर्थाने क्रूर, राक्षसी वृत्तीचे कोणीही नाही. मूलतः जगा व जगू द्या हीच त्यांची वृत्ती असते. हरणे व झेब्रे, रानरेडे, हत्ती असे सहजीवन सहज जगत असतात. क्रूरपणा, दुसऱ्याची निष्कारण हत्या करण्यात आनंद मानणारा प्राणी फक्त मानव आहे. आणि मानवा- मानवांतही निष्कारण वैर, धर्मावरून मारामाऱ्या, लढाया हे चालू असते. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मानवाला सहजीवनाचा खरा अर्थच समजलेला नाही. तो आपापसांत खोट्या हद्दी निर्माण करतो, एकमेकांचा द्वेष करतो व त्यापोटी सहज निष्कारण हत्या करण्यात त्याला काहीही चूक वाटत नाही. सहजीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळेल तो सुदिन, कारण तोच नैसर्गिक सुखी जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. ह्यालाच सामाजिक आदर्श जीवन म्हणता येईल. अशा सर्व गोष्टींचा समन्वयाने विचार केला तर हे सहज पटू शकते की शेवटी आपण सर्व प्राणीमात्र एक आहोत.

 म्हणजेच हे प्राणीजगत् आपण समजतो तसे नाही. मानवसुद्धा वैद्यकशास्त्र गृहीत धरते तसा नाही. प्रत्येक मानवाचे स्वतःचे एक वैशिष्ट्य आहे, हे आयुर्वेदाने जाणले होते. कारण आयुर्वेदाची निर्मितीच सर्वज्ञ ऋषिमुनींनी केलेली आहे व आपल्या ज्ञानाप्रमाणे व अनुभूतीप्रमाणे निरनिराळ्या संहिता लिहन ठेवलेल्या आहेत. असे ऋषिमुनी सर्व विश्वाशी जाणीवपूर्वक संबंध ठेवू शकत होते, ही जी कथा सांगितली जाते, त्यात तथ्य किती? सत्य किती व मिथ्या किती हे समजावून

१६४