पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

घेण्याचा आधुनिक मार्ग म्हणजे विज्ञान. त्याद्वारा जे सत्य लक्षात येते त्यावर आपण shoe विश्वास ठेवू शकतो. मानवाला जाणून घेऊ शकणारा मानवच आहे कारण त्याच्या बुद्धीची झेप अफाट आहे.

 मनुष्याला अशी ज्ञानेंद्रिये मिळालेली आहेत की ती सर्व पूर्णत्वाने वापरता आली तर कोणतेही ज्ञान अप्राप्य राहणार नाही. परंतु ही शक्ती सर्वांत असतेच असे नाही. सामान्य माणसाची चेतासंस्था ही हुशारीने आपल्याला हव्या त्याच संवेदना घेत असते. आपण अंगावर कपडे घालतो पण त्याची जाणीवही सहज आपणास नसते. आपण बाह्य गोष्टींकडे सहज दुर्लक्ष करतो व विसरूनही जातो. आल्डस हस्कलेची 'गाळणी करणारी व्हॉल्वची थिअरी' जाणिवेच्या बाबत आजही लागू पडते. आपल्या जाणिवा सर्व प्रकारच्या संवेदनातून आपल्याला हव्या तेवढ्याच गोष्टी गाळून चित्तात साठवून ठेवतात. यामुळेच आपल्या ज्ञानेंद्रियांच्या पाहणे, ऐकणे, जाणून घेणे या शक्ती कोत्या आहेत, त्यांना काही मर्यादा आहेत असे आपण गृहीत धरतो. परंतु सत्यात तसे नाही. आपली ही शक्ती अफाट आहे. शांडिंजरने एक किस्सा लिहून ठेवला आहे. तो म्हणतो -

 “सुमारे वीस वा तीस वर्षांपूर्वी काही रसायनवेत्त्यांनी (Chemist) अशी एक चमत्कारिक पांढरी पावडर शोधून काढली की ती काही लोकांना अत्यंत बेचव लागली तर काही लोकांना कडूजहर वाटली. या निरनिराळ्या व्यक्तींची 'चव' ओळखण्याची शक्ती ही त्यांना आनुवंशिकतेने लाभली होती का? मेंडेलच्या नियमान्वये हे घडते का? रक्तगट जसे आनुवंशिकतेने येत असतात तसे हे आहे का? आज याला निश्चित उत्तर सांगता येत नाही.

 तेव्हा संवेदना व जाणिवा याबाबत निरनिराळ्या व्यक्तींत कमालीचा फरक पडलेला आढळतो. हे नाकारणे म्हणजे डोळे असून आंधळेपण आहे. अकबर- बिरबलाची एक गोष्ट आहे. त्यात बिरबलाला अकबराने दिल्लीत किती लोक डोळस आहेत व किती अंध आहेत, याची गणना करावयास सांगितले. दुसऱ्या दिवशी बिरबलाने रस्त्याच्या कडेला तीन धोंडे मांडून त्यावर खिचडी शिजावयास ठेवली. या रस्त्याने जे अंध गेले त्यांना काही दिसतच नव्हते, तेव्हा त्यांची नावे ओघानेच अंध या गटात गेली. परंतु चांगली डोळस माणसे जेव्हा "बिरबल, हे काय करतो

१६५