पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

खळबळ माजविणारा विकार. ताप येणे, अंगावर लाल पुटकुळ्या उद्भवणे या गोष्टी त्या काळच्या अमेरिकन्सनाही माहीत होत्या. आजचा तर प्रश्नच नाही. हा रोग एक प्रकारच्या विषाणूमुळे होत असतो. हवाई बेटावरील आदिवासींना याचा कधीच अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांचे याबाबतचे ज्ञान व प्रतिकारक्षमता शून्य. त्या आदिवासींतील हजारो व्यक्ती या रोगाने मरण पावल्या. पुढे सवयीने प्रतिकारक्षमता वाढली व अमेरिकन्स व हवाई रहिवासी यांत फरक उरला नाही. या विषाणूने त्यांच्या शरीरात एवढी खळबळ निर्माण केली की प्रथम जरी अनेक लोक मृत्युमुखी पडले तरी त्यातूनच त्यांची उच्च दर्जाची प्रतिकारक्षमता निर्माण झाली. अशा अनेक अनुभवांतूनच मानवाने लशी निर्माण केल्या. लस म्हणजे सूक्ष्म स्वरूपात रोगनिर्मितीच. या लशीमुळे शरीरात 'अँटिबॉडीज' निर्माण होतात व भविष्यकाळात जर असा रोग नैसर्गिक रीत्या आला तर त्यापासून आपले संरक्षण होते. ह्या कार्यात जर 'अँटिबॉडीज' निर्माणच झाल्या नाहीत, आपल्या मूळ प्रतिकारशक्तीने ते जंतू नष्टच करून टाकले तर 'अँटिबॉडीजच' निर्माण होणार नाहीत, मग त्या विकाराला तोंड देण्याची प्रतिकारशक्ती वाढण्याचे कार्य होणारच nahi याला असे म्हणता येईल की "आपले शरीर आरोग्यनिर्मिती विकारामुळेच करत असते. विकार घ्या, प्रतिकार निर्माण करा.” याला उपमा द्यावयाची तर असे म्हणता येईल की शरीराच्या हालचालींसाठी जी ऊर्जा लागते ती बाह्य विश्वातून मिळवा. म्हणजे बाह्य विश्वातील वस्तुमात्र घ्यावयाचे, त्याचे रूपांतर ऊर्जेमध्ये करावयाचे व ती ऊर्जा कार्यासाठी वापरावयाची. तसेच बाह्य विश्वातून जीवाणू, विषाणू घ्यावयाचे व त्यांच्या विरुद्ध आपली प्रतिकारक्षमता वाढवावयाची.

 या उपपत्तीला अपवाद म्हणजे जन्म घेणारी अशी बालके असतात की जी असे विकार घेऊन जन्माला येतात की त्यांच्याजवळ यांना प्रतिकारशक्तीच नसते. हे अभागी जीव 'अँटिबॉडीज' निर्माणच करू शकत नाहीत. जी निसर्गत: इतर बालके जीवाणू, विषाणू यांचा प्रतिकार करण्यासाठी उपयोगी पडतात. ही अभागी बालके बहुधा मृत्युमुखी पडतात. हल्ली नवीन उपाययोजना निर्माण केली गेली आहे. ती म्हणजे त्यांना पूर्ण निर्जंतुक छोट्याशा फुगावजा आवरणात ठेवावयाचे. ह्यांची बाह्य विश्वातून येणाऱ्या जीवाणूंचा प्रतिकार करणे, अनुभवाने त्याची शक्ती वाढवणे ही कार्यशक्ती अस्तित्वातच नसते. आपल्या देहाला, प्रत्येक अवयवाला किंबहुना

170