पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

कोठलाही महापूर आला तर ताठ वृक्ष उन्मळून पडतात पण लव्हाळे मात्र वाचतात, ते लव्हाळे जसे लवचिक असतात, आलेल्या परिस्थितीशी जमवून घेतात तसे आपल्याला जरुरींनुसार योग्य लवचिकता दाखवून देह व मन यांची जी एकरूपता आहे ती टिकवता आली पाहिजे. मग निरोगी स्थिती व आजार यामध्ये जो कालखंड

तो त्या काळाचा या वादळावर मात करण्यास शरीराचे ज्ञान व बुद्धी यांचा वापर करूनच उपयोग होईल, यश मिळेल. या कार्यात आपले मित्र कोण व शत्रू कोण याची जाण ठेवता आली पाहिजे. निसर्गाशी मैत्री, उत्तम दिनचर्या, व्यायाम, साधा पण सकस आहार व शांत निद्रा हे आरोग्याचे मित्र तर निसर्गाशी शत्रुत्व, कालबद्ध दिनचर्येचा अभाव, स्वादिष्ट, जिभेला आनंद देणारा निकस आहार, सिगारेट- दारूसारखी व्यसने, व्यायामाचा अभाव हे त्याचे शत्रू होत. पण आपली स्थिती नंतर कळते पण वळत नाही अशी होते. यात मनाचे ताणतणाव, नैराश्य, संतप्त वृत्ती, काळजी, चिंता हे तर महाभयंकर शत्रू होत. प्रत्येक व्यक्तीमध्ये शरीराच्या अंतर्भागी आरोग्यदायी स्थिती कायम राखण्याची एक शक्ती (Homeostatic Capacity) असते. ही बाहेरून येणाऱ्या वादळाला ताठ झाडाप्रमाणे नव्हे तर लव्हाळ्याप्रमाणे लवचिक होऊन तोंड देते व शरीराच्या अंतर्भागाचा समतोल राखते. युद्धामध्ये नेहमी प्रत्यक्ष समोरासमोर तोंड देणारी सैनिकांची फळी असते तशीच त्यांच्या मागे दुसरी फळी असते, रसद पुरवणारी आणखी एक फळी असते. तसेच विकारांच्या लढाईत आपली अंतर्गत शक्ती ही पहिली फळीच राहिली पाहिजे. औषधे, इंजेक्शन्स, शल्यकर्म या त्यानंतरच्या फळ्या म्हणजे उपचारांच्या मार्गाचे दुय्यम स्थान असावयास पाहिजे.

 येथे व्यक्तिव्यक्तीगणिक याची सतत पाहणी करणे आवश्यक असते. काही वेळेला सुरुवातीच्या थंड पण मंद वाऱ्याचे भयानक वादळात रूपांतर होते, तसे वरवरचा वाटणारा आजार अतिगंभीर रूप धारण करू शकतो. कांजिण्यांचेच पाहाना. हा काही विलक्षण रोग नाही. पण कधी कधी त्याचा प्रसार डोळे, छाती, मेंदू यामध्ये होऊ शकतो. त्यातून न्युमोनिया, मेंदुदाह असे गंभीर स्वरूप येऊ शकते. पायात काहीतरी टोचले तर आपण दुर्लक्ष करतो, पण ती गंज चढलेली चूक असेल तर? त्यापासून जिवाला धोका निर्माण करणारे दूषित रक्तविषार (Blood Poisoning) किंवा धनुर्वातही होऊ शकतो. अशा घटनांमध्ये आपले शरीराच्या

१७२