पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

सुटका करावयाची. असेच दुसरे उदाहरण म्हणजे मधुमेहाचे. हा कधीच बरा होत नाही हा मूलभूत विचार. तोही तितकासा खरा नाही (पाहा - माझे 'मधुमेह' हे पुस्तक). रक्तशर्करा वाढली म्हणून 'इंस्यूलिन' वाढवावयाचे व त्यातून रक्तशर्करा निम्न पातळीवर आली (Hypoglysamia) तर साखर खावयाची. संपूर्ण चौकशी करून 'इंस्युलिनच' कमी करावयास पाहिजे. रक्तशर्करा तात्पुरत्या ताणतणावांनी सुद्धा खूप वाढू शकते. आणि कोणाही रुग्णाचा संपूर्ण इतिहास कोठेच ठेवला जात नाही. इतिहास म्हणून जी फाइल ठेवली जाते ती प्रथमपासून औषधोपचार काय केले व निरनिराळ्या चाचण्यांमध्ये काय निष्कर्ष मिळाले याची. अशी अनंत उदाहरणे सांगता येतील. येथे अत्यंत जरूर असते ती त्या रुग्णाच्या दीर्घकाळ असणाऱ्या मानसिक ताणतणावांच्या इतिहासाची आता औद्योगिक क्षेत्रात 'ताणतणावांचे व्यवस्थापन' (Stress Management) हा महत्त्वाचा विषय झाला आहे. तो एक उद्योगातील व्यक्तींच्या वर्तणूक प्रतिसादातील ( Organizational Behaviour) एक महत्त्वाचा भाग आहे. पण ते व्यवस्थापन अपुरे पडते. पन्नाशीच्या आतच अनेक उच्च दर्जाचे सेवक हृदयरोगांचे बळी होतात व हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बायपास, अँजिओप्लॅस्टी हे वरवरचे उपाय व मूळ कारणच नष्ट होत नाही. तेव्हा मनाचा विचार करून मनःशांती मिळाल्याशिवाय औषधे, इंजेक्शन्स, शल्यकर्म ही व्यक्तीसाठी रोगापासून पूर्ण मुक्ती मिळवण्यास फारच अपुरी

पडतात.

 काही रोग बरा करण्याचे ज्ञान शरीराला असतेच. शरीर हेच डॉक्टर आहे, औषधे निर्माण करण्याची फार्मसी आहे. प्रिगोजिनची थिअरी वेगळ्या शब्दांत अशीच मांडता येईल. पण ते मूळ सत्याच्या अगदी जवळ आहे. यासाठी देह व मन यांची पूर्ण सहकाराची जरुरी असते. तेव्हाच आपल्या शरीराचे संपूर्ण ज्ञान व अनुभव कामी येत असतात. अनेक वेळा असे किस्से घडतात की उत्तमातील उत्तम डॉक्टर किंवा अनेक तज्ज्ञसुद्धा त्या दृश्य आजाराचे निदान करू शकत नाहीत. सगळ्या औषधोपचारांना काहीही प्रतिसाद मिळत नाही. यांत्रिक तपासण्या वरवरची स्थिती दाखवतात व त्यांना वैद्यकशास्त्रातील एखाद्या रोगाच्या नावाचा शिक्का बसतो. शल्यकर्मही हा रोग दूर करील याची खात्री देता येत नाही. तरीही अंदाजपंचे उपाय - योजना चालूच राहते. हे अंधारात चाचपडणे अनेक दिवस किंवा महिनेही चालू

१७४