पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नॅन्सीला परत परत येणारे हे दुखणे व सर्व रिपोर्ट पाहून त्या तज्ज्ञाला (Thoracic Specialist) त्या भागातील कूर्चांच्या भागात कर्करोग झाला असल्याची शंका आली. ओघानेच बायोप्सी आलीच. पण नॅन्सीने हे सर्व नाकारून ती घरी आली. तिला ऑटोसजेशन (Auto suggestion) संबंधी माहिती होती असे दिसते. तिने सतत दोन वर्षे अनेक डॉक्टर, अनेक तपासण्या यातून काहीच निष्पन्न न झाल्याने ऑटोसजेशनचा वापर करण्याचे ठरविले. तिने ही पद्धत स्वतःच का निवडली हे तिला सांगता येईना. परंतु या मार्गाने तिला हळूहळू बरे वाटू लागले. काही काळ असा दुखण्याचा विकार परत सुरू होई तेव्हा ती परत ध्यान करून सर्व लक्ष त्यावर केंद्रित करत असते. कित्येक वर्षांत तिला जेवढा आराम मिळाला नव्हता तेवढा आता मिळू लागला. हळूहळू यातून ती पूर्ण बरी झाली. सर्व डॉक्टर्सनाही ह्या गोष्टीचे आश्चर्य वाटले.
 ही किंवा अशाच घडलेल्या कहाण्या आपण पाहणार आहोत. याबाबत आपण काय मजावयाचे? या घटना काही व्यक्तींच्याच बाबत का घडतात? सर्वांच्याच बाबत का घडत नाहीत? हा योगायोग म्हणजे 'कावळा बसायला व फांदी मोडायला एकच गाठ पडली' या उक्तीप्रमाणे आहे का? वैद्यकशास्त्राचे अभिमानी नेहमीच म्हणतात की प्रत्येक विकाराचा ठराविक काळ असू शकतो. रोगाचा उद्भव, तो टिपेला जाणे व नंतर हळूहळू नाहीसा होणे ही नैसर्गिक घटना आहे. यात आध्यात्मिक गोष्टींचा किंवा असा शक्तीचा काहीही संबंध नाही. विज्ञानाला हे मान्य नाही. पुढील प्रकरणात अशा अनेक कहाण्या येतील. मनाची शक्ती किती अफाट आहे हे दर्शवणाऱ्या त्या घटना आहेत. मनामध्ये आत्यंतिक भीती उत्पन्न झाली तर अत्यंत निरोगी व्यक्तीही वावटळीत सापडलेल्या वृक्षासारखी उन्मळून पडते व आता मृत्यू निश्चित आहे हे वैद्यकीय शास्त्रानुसार ठरलेले रुग्ण खडखडीत बरे होतात.

 आधुनिक विज्ञानाच्या चाचण्या घेण्याचे काही मार्ग आहेत. त्यांत एक असा की नेहमीच्या व्यवहारात, अनेक जाहिरातीत जे दावे केले जातात त्याची सत्या- सत्यता पडताळून पाहण्यासाठी 'ब्लॉकिंग' म्हणजे दोन समान गट करावयाचे, त्यांना अशा चाचण्या लावावयाच्या. आपण असे समजू की दोन निरनिराळ्या साबणाच्या कंपन्यांनी (डिटरजंट) आपली पावडरच श्रेष्ठ आहे असे दावे केले आहेत. तर दोन्ही साबणांच्या वापराने, समान मळलेल्या कपड्यावर त्याचा प्रयोग करणे

१७६