पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जण ताणतणावाखाली होते, त्यांची वये काय होती, त्यांना कौटुंबिक सुख व पाठिंबा किती मिळत होता, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात व त्या सर्व गोष्टी समान असलेल्या व्यक्ती सापडणे कठीण असते. मग हे प्रयोग पूर्णतः वैज्ञानिक निकषाला उतरतील का? परामानसशास्त्र असाच एक विषय, ज्याला भोंदूगिरी म्हणन संबोधले गेले. ज्योतिषशास्त्रही विश्वासार्ह शास्त्र नाही असे म्हटले जाते. परंतु ग्रह व तारे यांचे आपणावर निश्चितपणे काही परिणाम होत असतात हे झालेले आहे. मग ज्योतिषशास्त्र ही भोंदूगिरी आहे असे म्हणणे कितपत बरोबर? तेव्हा ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, शास्त्रीय दृष्ट्या ज्यांचे मोजमाप करता येत नाही, खऱ्या व खोट्या गोष्टी ओळखण्यासाठी ज्यांची परीक्षा, मापेमाहीत नाहीत, त्यांना आपल्या आकलनशक्तीपलीकडील म्हणावयाचे. यांचा जे स्वार्थाकरिता दुरुपयोग करतात ते भोंदू व जे काहीही विचार न करता फसवणुकीला बळी पडतात ते अंधश्रद्ध. ही अंधश्रद्धा नको. डोळसपणे पाहून सारासार विचार करून, शक्य त्या चाचण्या लावून जर त्यांत सत्य सापडले तर ती डोळस श्रद्धा.

 अत्यंत वैज्ञानिक, आधुनिक व श्रेष्ठ समजली जाणारी वैद्यक पद्धत आहे असे समजले जाते. सर्वसामान्यपणे लोक पूर्ण श्रद्धेने औषधे घेत असतात. पण अत्यंत उच्चशिक्षित, समाजात मान असणारे तज्ज्ञही दुःखितांना पिळणारे असे आहेतच की. दुसरे, असे पेशंटही उठसूट डॉक्टरकडे पळत असतात. साध्या साध्या नैसर्गिक नियमांची माहिती करून न घेणे, आरोग्याचे नियम न पाळणे व प्रत्येक विकारावर फक्त औषधाद्वारेच उपाय शोधावयाचा हे अगदी सर्वसामान्य आहे. सतत औषधोपचाराने सुद्धा शरीराचा नाशच होत असतो हेच कोणीही ध्यानातच घेत नाहीत. वैद्यकशास्त्राच्या उपयुक्ततेच्या सीमा जाणून घेण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. पुढे येणाऱ्या अनेक कहाण्यांत एक तर वैद्यकशास्त्राला काहीही करता आले नाही परंतु श्रद्धा, भक्ती, प्रार्थना असल्या आध्यात्मिक मार्गाने ते रुग्ण पूर्ण बरे झाले, किंवा वैद्यकीय दृष्ट्या काहीही कारण नसताना अत्यंत तरुण व तगडे लोक क्षणात मरून पडले असे आढळले. परमानसशास्त्र हे एक असे शास्त्र नाही की ज्यावर सहज विश्वास बसावा, परंतु त्याच्याही अशा कहाण्या प्रसिद्ध आहेत. तेव्हा वैज्ञानिक चाचण्या लावून सर्वच समस्यांची उत्तरे व त्यावरील उपाय मिळतीलच असे निश्चितपणे सांगता येत नाही. तेव्हा ज्या गोष्टींचे आकलन

१७८