पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्व सोमवारीच का घडते? इतर सहा दिवसही सकाळ येतेच की? प्लेटलेटस्चा चिकटपणा किंवा त्यांचे एकत्रित येणे हेसुद्धा सर्व बारी येतच असते. काही व्यक्तींना मुळात हृदयविकार असेल तर त्याला आधुनिक वैद्यकात खूप औषधे आहेतच की. ती घेऊन हृदयविकार टाळता यावयास पाहिजे. पण तसे होत नाही. संशोधन, जिज्ञासा या लोकांना फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यासाठी लागणारा अफाट पैसाही त्यांचेकडे आहे. या शापावर उःशाप काय असावा याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न झाला.
 आधुनिक युगातील ताणतणाव ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. अभ्यासकांना असे आढळले की 'काळा सोमवार' या शापाला सगळेच काही बळी पडत नाहीत. अनेकांना तर काहीच आजार होत नाही. त्या तणावांना सहज तोंड देऊ शकणाऱ्या लोकांचा अभ्यास केल्यावर असे आढळले की त्यांची ताणतणाव सहन करण्याची शक्तीच अतिशय असते यामुळे नोकरीतील ताणतणाव हे हृदयविकाराचे कारण मुख्यत: असूच शकत नाही. तेव्हा या शापाला निश्चित उःशाप असलाच पाहिजे. बेल टेलिफोन कंपनीतील सुमारे २०० अधिकारी व्यक्तींची कंपनीत मेजर बदल होत असतानाची स्थिती अभ्यासली गेली. तसे सगळेच अधिकारी ताणाखाली होते. या कंपनीचे स्वतःचे एक खास कार्डिअॅक युनिट होते. कारण पन्नाशीच्या आसपास असणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना पूर्वी हृदयविकाराचे आघात झाले होते. यांतील पन्ना टक्के अधिकान्यांना या वाढत्या ताणतणावांचा काहीही त्रास झाला नाही. हे अधिकारी भरपूर काम करावयाचे व कामानंतरचा कौटुंबिक व सामाजिक काळही ते आनंदाने व्यतीत करत होते. यावर काढलेले निष्कर्ष व उपाय असे -
 (१) दृष्टिकोनात सुधारणा :

 नोकरीपेशातील प्रत्येक समस्येकडे जास्त आशावादी दृष्टिकोनातून बघणे. एका तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे, “तुमच्यासमोर एक अर्धा पाण्याने भरलेला ग्लास ठेवलेला आहे. तो अर्धाच भरलेला आहे म्हणून दुःख न मानता तो अर्धा भरलेला आहे याचा आनंद माना. याला मानसशास्त्रज्ञांनी 'आशावादी दृष्टिकोन' (Optimistic Cognitive Appraisal) असे नाव दिलेले आहे. ही दृष्टी जर जीवनाचे अतूट अंग बनेल तर पेशातील समस्या, ताणतणाव ह्या गोष्टी म्हणजे जणू 'विश्वाचा' अंत

१९२