पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. त्यात सतत पाणी वाहत असतेच. पण कालचे पाणी आज नाही व आजचे उद्या असणार नाही हेच सत्य असते. हा प्रवाहच जर खुंटला तर ती नदी - नदी राहत नाही. हे आपल्या तत्त्वज्ञानाने दिलेले ज्ञान आहे. उपनिषदे व त्यापेक्षा त्यांतील एकत्रित स्वरूपात असलेले गीतेतील ज्ञान फार उपयोगी पडते. वर सुचवलेले उपाय शतकानुशतके आपल्याला ज्ञात आहेत पण आपण ते विसरलेले आहोत.
 जन्म आणि मृत्यू यासंबंधी सांख्ययोगात
  वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोऽपराणि ।
  तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २२ ॥
 यापुढील श्लोक असे आहेत
  नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
  न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३ ॥
  अच्छेद्योऽयमदाह्योऽक्लेद्योऽशोष्य एव च ।
  नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽचं सनातनः ॥ २४ ॥
  अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
  तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितमर्हसि ॥ २५ ॥
 यमधर्माने नचिकेताला दिलेले ज्ञान ते हेच. आत्मा अमर आहे तर जन्म कुठला आणि मृत्यू कोठला ? हे तत्त्वज्ञान समजावून घेतले तर समस्या, त्यांची आव्हाने व त्यावरील उपाय हे सर्व निरर्थक ठरते. आणि मग........

 "सुख - दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ !" हे तत्त्वज्ञान पटू लागते. या पुढेही ज्या आयुष्यात आढळणान्या घटना आपण पाहणार आहोत, त्या भारतीयही आहेत व अमेरिकनही आहेत. अमेरिकेत सहज आढळणाऱ्या मानसिक विकृती त्यामानाने आपल्याकडे कमी आहेत. परंतु शेवटी माणूस कोठल्याही जातीचा असो, देशाचा असो, सर्वांची मने समान आहेत. फरक असा आहे की, अमेरिकेत आणि आपल्याकडेही वैद्यकशास्त्र या सर्वांवर तोडगा औषधोपचारामधून शोधत असते. मानसशास्त्रज्ञसुद्धा मेंदूत निर्माण होणारे रासायनिक स्राव हेच अंतिम कारण धरतात. पण या कारणाचेही कारण तेथे नसतेच. ते असते तुमच्या मनाहीपलीकडील काही गोष्टींत. अशा काही कहाण्या आपण पाहू. या मुद्दाम विकाराशी निगडीत

१९४