पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच्याशी बोलणे होईपर्यंत थांबणेसुद्धा अशक्य झाले. पण शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी बोस्टन येथे फोन लागला व मी त्याला विमानाचा प्रवास करू नकोस अशी विनवणी केली. मला जे अनामिक भय वाटत होते ते नीट सांगता येईना. पण सुदैवाने त्याचे वॉशिंग्टनला जाणे रहित झाले. त्याने आपले तिकीट कॅन्सल केले होते. नंतर बातमी आली की, ते विमान वॉशिंग्टन विमानतळावर पोहोचत असताना दुसऱ्या विमानाशी त्याची टक्कर होऊन आतील सर्व प्रवासी ठार झाले. त्याचे तुकडे पोटोमॅक नदीत पडले.” अशा आयत्या वेळी तिकीट रद्द केल्यामुळे प्राण वाचल्याच्या कहाण्या आपल्याकडेही घडल्या आहेत.
 अशीच अमेरिकन कहाणी ध्यानात घेण्याजोगी आहे. या गृहिणीचा पती एका मोठ्या आइसक्रीम कारखान्याचा मॅनेजर होता. ही फॅक्टरी त्यांच्या घरापासून सुमारे तीन मैलांवर होती. कामाच्या जरुरीप्रमाणे तो रात्री ११ ते पहाटे ६ वा. केव्हाही घरी येत असे. पण त्या पत्नीला त्याची कधीही काळजी वाटली नाही. एक दिवस त्याची वाट पाहत ती टेलिव्हिजन पाहत बसली होती. परंतु तिचे तिकडे लक्ष लागेना. तिला अनामिक काळजीने घेरले होते. तिने अनेक वेळा फोन करूनही फोनला उत्तर मिळेना. शेवटी रात्री दोन वाजता स्वतः ती फॅक्टरीत गेली. फॅक्टरीच्या दाराला कुलूप. तेव्हा एका खिडकीचे दार मोडून तिने आत प्रवेश केला. तिचा पती त्या कोल्ड स्टोअरेजमध्ये अडकून पडला होता. आणि नंतर तपास करता तिला असे आढळले की आपल्या घरी तिला ज्या वेळेस भीतीने घेरले, त्याच्या आधी काही क्षण हा पती कोल्ड स्टोअरेजमध्ये अडकला होता.

 या घटना अनाकलनीय आहेत. कोठल्याही शास्त्रात न बसणाऱ्या. अशी कोणती शक्ती आहे की जी त्या त्या जोडीदाराला विशेषतः स्त्रियांना संकटाची पूर्वसूचना देते? ह्या कथेचा सहज लक्षात येण्याजोगा भाग म्हणजे त्या पतिपत्नींची आत्यंतिक एकरूपता. अशीही अनेक उदाहरणे आहेत की या जोडीपैकी एक साथीदार जर मृत्यू पावला तर दुसरा जोडीदार तत्क्षणी किंवा अल्प कालातच झुरून झुरून मरण पावतो. याच्या अमेरिकेत केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले की एकूण ७ लक्ष लोकांची पाहणी केली, त्यापैकी ३५ हजार जोडीदार पहिल्या वर्षातच मृत्युमुखी पडले. न्यूयॉर्कच्या माऊंट सिनाई हॉस्पिटलमध्ये केलेल्या पाहणीत असे

२०३