पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आढळून आले की २०% मृत्यू अशा प्रकारे घडत असतात. अभ्यासात असे आढळते की, या जोडीतील दोन्ही व्यक्ती काही कालांतराने इतक्या एकरूप होतात की जणू शरीरे वेगळी असली तरी मने एक असतात. हे एकरूपतेचे बंधन मृत्यूने तोडले की उरल्या जीवाचा आयुष्याचा अर्थच संपतो. देह-मनाच्या संबंधाचा असा अनाकलनीय भाग प्रत्यक्षात दिसू लागतो.
 ह्या कहाण्या फक्त पाश्चात्य राष्ट्रांतच घडल्या आहेत असे नाही. भारतातही अशा अनेक कहाण्या घडलेल्या आहेत. पण त्यांची नोंद नीट ठेवली गेलेली आहे असे दिसत नाही. नमुना म्हणून एकच कहाणी पाहू या. ही शंभर वर्षांपूर्वी घडलेली सत्यघटना आहे. ही हकीकत माझ्या वडिलांनी सांगितलेली आहे.
 ब्राह्मण कुटुंबातील एक सुरेख मुलगी. वयाच्या आठव्या वर्षी विवाह झाला. मुलगा बारा वर्षे वयाचा. मुलगी सासरी हळूहळू रुळली. सासुरवास अजिबात नाही. वयात आली. संसार सुरू झाला. परंतु मूल झालेले नव्हते. गावात प्लेगची साथ आली. दुर्दैवाने तिच्या नवन्यालाच त्याची बाधा झाली. अवघ्या एक आठवड्यातच तो प्लेगला बळी पडला. मुलीला हा आघात फार मोठा होता. बारा वर्षे नवऱ्याच्या सहवासात घालवून ती जणू त्याच्याशी एकरूप झाली होती. नवऱ्याच्या मृत्यूच्या धक्क्याने तिचीच बाचाच गेली. त्या काळच्या प्रथेप्रमाणे तिचे केशवपन करण्यात आले. सासुसासरे म्हातारे. ही जणू या जगात नसल्यासारखी एकलकोंडी झाली. शेवटी तिच्या दिरांनी तिला माहेरी आणून सोडले. पण तेथेही ती सुधारली नाहीच. शेवटी झुरून झुरून सहा महिन्यांतच मृत्युमुखी पडली.

 ही दोन व्यक्तींमधील एकरूपता फक्त पतिपत्नीतच असते असे नाही. माता व पुत्र, पाठचे बंधू किंबहुना मित्रामध्येही आढळते. युद्धकाळी आपला मित्र शत्रूच्या हल्ल्यात बळी पडलेला पाहून पळून जाण्याची संधी असूनही उलट त्या शत्रूवर हल्ला करून सूड घेता घेता आपलाही जीव घालवणारे मित्र अनेक होऊन गेले. ही एकरूपता फक्त बौद्धिक किंवा मानसिक असते असे नाही. तिला वांशिक अंग असते असे आढळून आले आहे. काही माकडांच्या जातीत आईपासून मूल तुटले, त्याला वाढीसाठी नैसर्गिक मातेची माया व तिच्याकडून संवर्धन मिळाले नाही तर त्या बच्च्याच्या मेंदूची वाढही नीट होत नाही. उदाहणार्थ ह्या मुलाच्या मेंदूमध्ये

२०४