पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होणारे बदल अशा सर्व गोष्टींचे उगमस्थान काय? लोकांना वाटते हे मेंदूमधून घडत असते. पण त्याचा उगम अन्नमार्गातूनही असू शकतो. कारण मेंदू व अन्नमार्ग यामध्येही अशी यंत्रणा आहेच की.
मानव आणि प्राणी :
 कँडेस पर्टचे संशोधन एका अर्थी विचारात क्रांती घडवणारे आहे. मानवामध्ये आढळणारे न्यूरोट्रॅन्समीटर्स्, पेप्टाइड हार्मोन्स आणि रिसेप्टर साइटस् ह्या गोष्टी इतर सर्व प्राण्यांतही आढळतात. प्रोटोझोआ हा एक सूक्ष्म जीव याला 'टेट्राहायमेना' असे नाव आहे. हा इतका सूक्ष्म जीव इन्शुलिन व बीटा एंडॉर्फिन्स यांची निर्मिती करू शकतो. त्याच्या रिसेप्टर साइटस्ही अगदी मानवाप्रमाणे आहेत. यापेक्षा मोठा जीव उंदीर, पण आपल्या मानाने खूपच लहान. याच्याही रिसेप्टर साइटस् अगदी मानवाप्रमाणेच आहेत. तेव्हा प्रोटोझोआ, उंदीर व माणूस यांत हे केवढे साम्य आढळते. यावर कँडेसचे म्हणणे आपल्याला एक नवीच दृष्टी देते. ती म्हणते-

 "माझ्या मेंदूतील आणि तुमच्या मेंदूतील रिसेप्टर साइटस् एकाच प्रकारच्या रेणूच्या आहेत. हा शोध सर्व जीवांची एकता व साधी रचना दर्शवितो."

 याची तुलना डी. एन्. ए. च्या कोडनुसार प्रोटीननिर्मितीशी करता येईल. ही प्रोटीन्स म्हणजे जीवनाचा पाया. या पायात सुमारे ६०० संदेशवाहक अणू- न्यूरोपेप्टाइडस् असतात व ते भावनांचे प्रकटीकरण करतात, किंवा चेतना निर्माण करतात. प्रोटोझोआ या जीवाणूचा अभ्यास असे दर्शवतो, की अशा जीवांची रचना कितीही गुंतागुंतीची ठरत असली तरी रिसेप्टर अणू हे मात्र न बदलता स्थिर असतात.

 मानव, उंदीर व प्रोटोझोआ असे सूक्ष्म जीवाणू यांच्या मेंदूच्या अणूत अतिशय साम्य आहे. याचा अर्थ काय? मानवेतर जे इतर जीव आहेत, त्यांनाही मानवाप्रमाणेच भावभावना आहेत का? असणारच. कारण त्यांचे भावभावना निर्माण करणारे अणू व मानवाचे अणू एकच आहेत. नाहीतर उंदीर व प्रोटोझोआ यांना 'एंडॉर्फिन' चे ‘रिसेप्टर्स' ची जरुरीच काय ? त्यांचेबाबत निसर्गाने हे उगीचच दागिने म्हणून नक्कीच निर्माण केलेले नाहीत. त्यांचेही काही कार्य असणारच. या शोधातून अशा अर्थ काढावयाचा का, की निरनिराळ्या प्राण्यांच्या जाती-उपजातीत

२०