पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रतिमा आणि प्रतिमा

 शिक्षण व विज्ञानाची कास यामार्गेच मानवाने आपली प्रगती साधली आहे. भारताची आजची लोकसंख्या व तिच्या वाढीचा वेग जर विचारात घेतला तर शिक्षण व आरोग्य यावर केला जाणारा खर्च केव्हाही अपुराच पडणार आहे. आणि या दोन महत्त्वाच्या गोष्टीकडे सरकार जवळजवळ लक्षच देत नाही, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. "या देशात खासगीकरण व जागतिकीकरण यांचे वारे फार जोरात वाहत आहेत. त्यानुसार ठिकठिकाणी खासगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत आहेत. मात्र देशातील वैद्यकीय शिक्षणाचा पायाच चुकीच्या कल्पनांवर आधारलेला आहे." असे उद्गार सुप्रसिद्ध डॉक्टर रजनीकांत आरोळे यांनी एका मुलाखतीत काढले होते. डॉ. आरोळे हे जामखेड येथील एकात्मिक ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक असून, त्यांना त्यांच्या जन्मभराच्या सेवेबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या मताप्रमाणे वैद्यकीय शिक्षणात औषधाला अकारण महत्त्व दिले जाते, परंतु मूलभूत असे आरोग्यशिक्षणाचे महत्त्व शिकवले जात नाही. आज आपल्या देशात ४० हजार प्रकारची औषधे निर्माण होतात तर नॉर्वेसारख्या प्रगत व श्रीमंत देशात फक्त एक हजार एवढीच औषधांची संख्या आहे. जगातील औषधी कंपन्यांची लॉबी ही अतिशय ताकदवान आहे. प्रभावी जाहिरात-तंत्रे वापरून औषधे खपवावयाची व त्यातून अफाट पैसा मिळवून तो

२१७