पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संवाद शक्य आहे? शक्यता आहे, फक्त यासाठी जी चेतना लागते ती निर्माण होत नसावी. मनुष्याचे बाबत मनाच्या उन्नयनामुळे अंतर्मनात अशी चेतना निर्माण होते. ही सिद्धी काहीच लोकांना प्राप्त होत असावी. सत्यकाम जाबाली परत गुरूकडे आल्यावर सांगतो की जंगलात वृक्षवल्ली प्राणी मला ज्ञान देत असत. ही ज्ञानाची देवाण - घेवाण संवादाशिवाय होऊच शकत नाही. पण हे होण्यासाठी त्या प्राण्यांची याबाबतच्या मानसाची तार जुळावी लागेल.

मानव, प्राणी आणि पक्षी :

 सत्यकाम जाबालीची कथा आपण पाहिली, पण हा अनुभव फक्त त्यालाच आला का? अशीच एक कथा ऐतरेय ब्राह्मणामध्ये आली आहे. या कथेवाटेही काही नेहमीची अनुभवाला न येणारी सत्ये, काही तत्त्वे सांगितली गेली आहेत.

 इक्ष्वाकु कुळातील राजा हरिश्चंद्राला पुत्र होत नव्हता. निपुत्रिकाला स्वर्गप्राप्ती होत नाही, अशी दृढ कल्पना त्या काळात अस्तित्वात होती. तेव्हा हरिश्चंद्राने तपश्चर्या करून वरुणाला प्रसन्न करून घेतले व एक पुत्र मागितला. वरुण म्हणतो की राजा तुझ्या दैवातच पुत्र नाही. परंतु मोक्षासाठी तुला एक पुत्र होईल व तो जन्मतःच मला दे (बळी). राजाने कबूल केले. यथावकाश राजाला पुत्र झाला. पुत्र होताच वरुण हजर. राजा म्हणाला, “ हा पुत्र तर अशुद्ध, तो शुद्ध होऊ दे." असे दरवेळी वरुण हजर झाला की काहीतरी सबबी सांगून राजाने ते बलिदान पुढे ढकलले. याला दात येऊदे, त्याचा व्रतबंध होऊ दे. वगैरे. शेवटी रोहित पूर्णपुरुष झाला, शस्त्रधारी झाला तेव्हा राजाने त्याला वरुणाची हकिगत सांगितली. रोहिताने ते नाकारून अरण्याचा रस्ता पकडला. एका खेड्यात तो कायम वास्तव्य करण्याचे ठरवत होता, तेव्हा इंद्र ब्राह्मणरूपाने तेथे हजर झाला व त्याने सल्ला दिला-

"नानाश्रांताय श्रीरस्तीति रोहित शुश्रुम ।
पापो नृषद्वरोजन इंद्र सच्चरतः सखा ।। चरैव इति ॥ "


काही काळ लोटल्यावर तिसऱ्या वर्षी इंद्र म्हणतो-

"आस्ते भग आसीनस्य, ऊर्ध्वं तिष्ठति तिष्ठतः ।
शेते निपद्य मानस्य चराति चरतो भगः
२१