पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फक्त स्वच्छ पाणी, परिसरस्वच्छता व संडासाची सोय एवढ्याच गोष्टींनी कमालीचा बदल घडला होता. हीच गोष्ट मुलांच्या वाढीच्या बाबत आली. अत्यंत शास्त्रीय आहार देऊनही त्यांची वाढ हार्वर्ड मिडिअनपेक्षा कमीच पडली. एवढे स्पष्ट निष्कर्ष येऊनही आय. सी. एम्.आर्. ने अमेरिकन निष्कर्ष उचलून धरले, आणि औषधोपचारांना निष्कारण प्रथम स्थान देण्यात आले.
 कै. डॉ. पां.वा. सुखात्मे हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पोषणतज्ज्ञ. त्यांनी या निष्कर्षाला विरोध केला. ते कसे चुकीचे आहेत, हे सिद्ध करण्यासाठी राहतवाडी, नरवडे, मारणेवाडी अशी आठ गावे निवडून तोच प्रयोग परत केला. त्याचे निष्कर्ष आपले डोळे उघडणारे आहेत. ते असे -
 (१) परिसराची व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी, संडासाची सोय केली तर रोगराई कमी होते.
 (२) रोगराईच कमी झाली की मुलांची शारीरिक वाढव वजन आश्चर्यकारकपणे सुधारते.
आपण यापासून स्पष्ट बोध घ्यावयाचा तो असा -
 (१) निसर्गाला अनुस्यूत स्वच्छ परिसर, स्वच्छ राहणी व स्वच्छ पाणी हे घटक आरोग्याचे (व ओघाने दीर्घायुष्याचे) कारण होते.
 (२) आहार हा साधा, स्थानिक उत्पादनावर आधारित असला तरी पुरतो. आपले शरीर त्याचा पुरेपूर उपयोग करून घेते. कृत्रिम, मुद्दाम सत्त्वे घातलेल्या व संस्कार केलेल्या अन्नाची जवळ जवळ काहीच जरुरी नसते. त्यांचा सतत वापर म्हणजे ते बनविणाऱ्या मुख्यतः परदेशी कंपन्यांचा खूप फायदा. निष्कारण टॉनिक्स घेणे याच सदराखाली येते.

 (३) औषधोपचाराचे स्थान सर्वात शेवटी आहे. आपत्कालीन उपयोग एवढीच त्यांची जरुरी. आरोग्याची खरी शिडी अशी आहे - (१) मनःस्वास्थ व मनाचे उन्नयन (२) आहार (३) व्यायाम व योगाभ्यास व शेवटी ( ४ ) औषधोपचार. आपली मनोधारणा मात्र बुद्धिभ्रंश करून स्वार्थासाठी औषधोपचाराला अति

२१९