पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उच्चस्थान देऊन एका अर्थी आपणाला गुलाम बनविले जाते. आणि त्यातील तज्ज्ञही आज पैसा हाच परमेश्वर मानून वैद्यकाचा पाया म्हणजे करुणा, सेवा, रुग्णाला मानसिक धीर देणे या गोष्टी विसरलेले दिसतात. आपणास मिळालेले ज्ञान, अनुभव यांतून निदानाची वैचारिक शक्ती वाढण्याऐवजी ते जास्तीत जास्त यांत्रिक उपकरणांवर अवलंबून राहू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून औषधांची लांबलचक यादी, त्यांचे अनेक वेळा होणारे गंभीर दुष्परिणाम इकडे कानाडोळा करण्याची वृत्तीही वाढली आहे. यात मुख्यतः औषध कंपन्या व नंतर व्यावसायिकांची त्यावरील अंधश्रद्धा हीही गोष्ट कारणीभूत आहेच.
यांत्रिक निदाने व मनःशक्ती :

  यांत्रिक निदानांत आधुनिक काळात अतोनात प्रगती झाली आहे यात संशय नाही. या यंत्रामध्ये दोन भाग करता येतील - (१) अंतर्गत (Invasive) (२) बाह्यांगी (Non-Invasive). ह्या बाह्यांगी तपासणीमध्ये रुग्णाला काहीही त्रास होत नाहीच परंतु अंतर्भागाची चित्रे मात्र पडद्यावर स्पष्ट दिसतात अथवा आलेखाद्वारे ती स्थिती कागदावर उमटते. उत्तम ज्ञान व अनुभव यावाटे या चित्रांचा व आलेखांचा अर्थ वैद्यकतज्ज्ञ लावत असतो. हा अर्थ लावणे हे शास्त्रही आहे आणि कलाही आहे. त्यांच्या अनंत पैलूंचा सखोल विचार करूनच निष्कर्ष काढावा लागतो. यामुळे अनुभवाने कमी व निष्काळजी तज्ज्ञ अनंत चुका करू शकतो. आपण साध्या कॅमेऱ्याने जशी सुस्पष्ट चित्रे घेऊ शकतो तशी ही चित्रे कधीच सामान्यांनाही सहज कळण्याजोगी नसतात. पण त्यांना प्रतिमा (Image) असे म्हटले जाते. उदा. एम्.आर.आय (Magnetic Resonace Imagine) यामुळे अवघड ठिकाणच्या स्थितीचे - जसे मेंदू - समर्पक चित्र वा प्रतिकृती तज्ज्ञाला सुस्पष्ट दिसते. पण या यांत्रिक चाचण्यांचा खर्च अफाट, गोरगरिबांना तो न परवडण्यासारखा. हे तज्ज्ञही तशी बरीच फी आकारतात. हे योग्य व साहजिक आहे. पण एवढे होऊनही शेवटी आपण औषधांचा आश्रय घेतच असतो. मूलभूत गोष्ट म्हणजे आपली संरक्षणयंत्रणा ही शक्तिवान असावी लागते. ती शक्ती औषधांनी कधीच वाढत नाही. येथे अध्यात्माची कास धरली तर परिणामी अतिशय गुणकारी व संरक्षणयंत्रणा शक्तिवान करणारी ती रीत ठरते. येथे एक स्पष्टपणे सांगावयास पाहिजे की नुसते अध्यात्म

२२०