पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुसरण्यामुळे रोगनिवारण होऊ शकत नाही. तेवढी शक्ती मिळवावयानी म्हणजे पूर्ण योगी बनावयास पाहिजे आणि हे लक्षावधी लोकांत एखाद्यालाच निश्चित शक्य होऊ शकते. त्यामुळे अध्यात्म हे वैद्यकशास्त्राला उत्तम व प्रभावशाली जोड होऊ शकते. वैद्यक नको अशी स्थिती येणे अशक्य आहे. फक्त जे महत्त्वाचे बदल सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते असे-
  (१) जरूर त्या चाचण्या घेण्याबद्दल कोणीही तक्रार करू नये. परंतु चाचण्या घेण्यापूर्वी जी लक्षणे सुस्पष्ट दिसत आहेत ती का निर्माण झाली, कोणता विकार यास कारणीभूत असावा ह्यावर चिंतन करून तेवढ्याच चाचण्या घेण्यात याव्यात. यामुळे चाचण्यांचा खर्च निश्चित कमी होईल व त्या निष्कर्षानुसार उपचार करणे इष्ट ठरेल. यामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्येही कमीत कमी दिवस राहावे लागेल.
  (२) रुग्णाला जी औषधांची यादी दिली जाते ती भली लांबलचक असते. हे विश्वमान्य तत्त्व आहे की आधुनिक औषधांना तीव्र दुष्परिणाम असतात. मग जितकी औषधे जास्त तितके दुष्परिणाम अधिक व त्यामुळे संरक्षणयंत्रणा आणखी आणखी अशक्त होत जाते. यासाठी कमीत कमी औषधांचा वापर होणे इष्ट आहे. आज अनेक वेळा असे दिसते की मूळ विकाराने जेवढे हाल होतील, त्यापेक्षा जास्तीत जास्त अपाय औषधांनी होतो. त्यातून अति औषधाच्या माऱ्यामुळे जे नवीन विकार (Drug Induced ) निर्माण होतात असे म्हणतो, त्यासाठी परत आणखी औषधे द्यावी लागतात व काही वेळा हे मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबत जाते. अंती दिवसेंदिवस प्रतिकारशक्तीच कमी होत गेल्यामुळे मृत्यू लवकर ओढवतो.

  (३) आधुनिक काळात अनेक जीवाणू वा विषाणू यामुळे निर्माण होणाऱ्या विकाराला पूर्वप्रतिबंध अथवा त्याविरुद्ध कार्य करणाऱ्या संरक्षणयंत्रणेला लढण्याचा अनुभव म्हणून त्यांच्याशी लुटुपुटीची लढाई. असे अशक्त जीवाणू शरीरात सोडून म्हणजेच लशीकरणाद्वारे प्रतिकारशक्ती वाढवली जाते. हे तत्त्वच सर्व प्रकारच्या उपचारांचा पाया व्हावयास पाहिजे. डॉ. हानिमान यांची होमिओ उपचार पद्धत निर्माण झाली. तसेच दोन अडीच हजार वर्षांपूर्वी जन्मास आलेला आयुर्वेद हा निसर्गदत्त वस्तू-धातू, पाने, फळे, बिया अशांपासून औषधे निर्माण करत आला आहे. आपले शरीरच पंचमहाभूतांपासून निर्माण झाले आहे. ह्या पंचमहाभूतांपासून

२१२