पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देऊन यामागची कार्यकारणरीत शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु अत्यंत कार्यरत डॉक्टर रुग्णासाठी मन लावून कार्य करत होते, त्यांचे पेशंटही सुशिक्षित, अभ्यासू व विश्वासाने ही पद्धत अमलात आणत होते. पण एवढा चमत्कार कोठल्याच केसमध्ये त्यांना आढळला नाही. एकूणच त्यांना असे आढळले की यात असे अनेक समस्याप्रधान प्रश्न आहेत. यामुळे यश कधी मिळे, कधी नाही. त्यांत निश्चिती नव्हती. सन १९८५ साली स्त्रियांच्या स्तनाच्या कॅन्सरबद्दल असाच एक अभ्यास करण्यात आला. हा पेन्सिव्हानिया विश्वविद्यालयामार्फत करण्यात आला होता. त्यातही त्यांना विकारमुक्ती व मनःशक्ती यांचा काय संबंध आहे याचा निष्कर्ष काढता आला नाही. यावर 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'च्या संपादकाने असे म्हटले की, "देह-मन संबंध व रोगमुक्ती ह्या गोष्टी म्हणजे लोकभ्रम आहेत. त्यात काहीही तथ्य नाही." यावर बरेच वादंग माजले होते. या अशाच अभ्यासात स्तनाच्या कॅन्सरबाबत तीन पूर्णतः निराळे अनुभव आले होते. अशाच एका अभ्यासात असे आढळले की जबर इच्छाशक्ती (Strong attitude) अथवा असा सक्रिय दृष्टिकोन या जीवघेण्या रोगापासून मुक्तीसाठी बऱ्याच प्रमाणात उपयोगी पडतो. यामुळे जे कॅन्सरचे पेशंट आपल्या भावभावना दडपून टाकतात त्यांच्या रोगात वाढ होत असते. म्हणजे ज्यांची जगण्याची तीव्र इच्छा असते अशा पेशंटचा एक गट व दुसरा ज्यांनी आशा सोडली आहे असा गट असे दोन गट तयार होतात.

 हृदयविकारी रुग्णांचेही असे दोन गट पाडण्यात आले आहेत. टाइप 'ए' ब टाइप 'बी'. यात टाइप 'ए' म्हणजे अतिशय कष्ट करणारा, सतत डोळ्यासमोर उद्दिष्टे ठेवून काम करणारा व ती उद्दिष्टे ओलांडण्याचा प्रयत्न करणारा, यामुळे सतत ताणाखाली असणारा. दुसरा 'बी' म्हणजे शांत स्वभावाचा, प्रतिक्रिया म्हणून न रागावणारा, भरपूर सहनशक्ती असलेला असा गट. पहिला गट ओघानेच हृदयविकाराला बळी पडणारा व दुसरा बळी न पडणारा हे सत्य समजले जाईल. परंतु दुर्दैवाने या संकल्पना खोट्या आहेत असेच सिद्ध झाले आहे. प्रत्येक व्यक्ती ही संपूर्ण वेगळी असते. तेव्हा मानवाची यांत्रिक पद्धतीने गटवार विभागणी करणे हे मुळात चूक आहे. प्रत्येक मनुष्यात काही अंशी गट 'ए' व काही अंशी गट 'बी' अस्तित्वात असतो. या अंशाच्या अस्तित्वाची गणिती पद्धतीने मोजणी करता येत नाही. त्यांचे असे शेकडो उपगट तयार होतील. मग एखाद्या व्यक्तीवर टाइप 'ए' व

२२६