पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुसऱ्या व्यक्तीवर टाइप 'बी' असा रबरी शिक्का कोठल्या पायावर मारता येईल हे अजून तरी शक्य झालेले नाही. या गटवारीवर विश्वास ठेवणारे व त्याचा उदोउदो करणारे अनेक तज्ज्ञ आजही भारतात आहेत. पण त्यांचे निदान बरोबर येईलच असे निश्चितपणे म्हणता येईल का ? आयुर्वेदाने त्या प्राचीन काळातही हे ओळखलेले होते. त्यातूनच वात, पित्त, कफ या तीन प्रकृतींची निर्मिती झाली. पण यातही काही अभेद्य भिंती नाहीत. त्यांची अनेक मिश्रणे होऊ शकतात हेही त्यांनी मान्य केलेले आहे. मग आज अत्यंत आधुनिक काळात अशा अभेद्य भिंती घालून सत्य प्रकाशात येणे कसे शक्य आहे? डॉ.मॉन्टनच्या रुग्णाला १०० टक्के यश मिळाले, इतरांना कमी - जास्त फरकाने मिळाले व ते का हे त्या अभ्यासकांना समजले नाही, याचे उत्तर येथे आढळते. १०० टक्के प्रकृती जाणून घ्यावयाची असेल तर संख्याशास्त्राने शक्य आहे असे म्हणता येईल. पण काही गोष्टी त्यांच्याही आवाक्यापलीकडे असतात. 'हे असे का' याला उत्तर आपल्याला समजत नाही एवढेच आहे. पण ते नाहीच असे म्हणणे योग्य नाही. याचे उत्तर शोधण्यासाठी जेव्हा विज्ञान कमी पडते तेव्हा आपणास अध्यात्माकडे वळावे लागते. याची उत्तरे पातंजल योगसूत्रे व गीता यांत सापडतात. येथे गीतेच्या अध्याय चार - ज्ञानकर्मसंन्यास योगातील अकरावा श्लोक लागू पडतो-

  ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥४.११॥

  "सर्व माणसे ज्या भावाने मला शरणं येतात, त्याला अनुरूप असे फल मी त्यांना देतो. सर्व जण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. ' आपल्या विषयापुरता याचा अर्थ एवढाच घेता येईल की ज्या श्रद्धेने, ज्या एकाग्रतेने आपण त्या विषयाशी एकरूप होऊ त्याच प्रमाणात आपल्याला फल मिळते. डॉ. सायमॉन्टनच्या पेशंटने सर्वस्वाने तो मार्ग अनुसरला, त्याला सर्वस्वाने फल प्राप्त झाले. इतरांना ते ज्या प्रमाणात त्या विषयाशी एकरूप झाले तेवढे यश मिळाले. ज्यांची श्रद्धाच नव्हती, जे केवळ कर्मकांड करत होते त्यांना यशाचा किरणसुद्धा दिसणे कठीणच. डॉ. डीन ऑर्निशचे हृदयरोगावरील पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर एकाएकी वैद्यकशास्त्रात ध्यानाला महत्त्व प्राप्त झाले. परंतु ध्यानधारणा म्हणजे

२२७