पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्षणात जमण्यासारखी गोष्ट नाही त्यासाठी तपश्चर्या लागते. ध्यानात त्या धारणेशी एकरूप व्हावे लागते. ज्या प्रमाणात हे तुम्ही साध्य करता त्याच प्रमाणात फलही मिळणार. (काही लोकांना या आध्यात्मिक गोष्टींचा बाजार करून भरपूर कमाईची मात्र संधी मिळते. ) तेव्हा यातील सत्य हेच आहे की यश किती मिळते व का मिळते याचा पल्ला शून्य ते इन्फिनिटी असू शकतो.
  यामुळेच की काय त्या यशोगिरीवर पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्याला जो रुचेल, जसा पचेल तो मार्ग त्याने अनुसरावा. ध्यानधारणा, भक्ती, प्रार्थना, जप, गंडेदोरे, अंगारा, तीर्थ, आधुनिक व्हिजुअलायझेशन किंवा आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत ती इमेजरी (Imagery) हे सर्व मार्ग बैलगाडीच्या चाकाच्या आया आहेत. प्रत्येक आरी शेवटी मध्यवर्ती कण्याकडेच जात असते. आपण मात्र हे मार्ग अवघड म्हणून न पत्करता प्रत्येक विकारासाठी निरनिराळ्या व नवनवीन औषधांच्या मागे लागतो. परंतु शरीर हेही एक औषधनिर्मितीचा कारखाना आहे व प्रत्येक विकारावर त्याच्याकडे औषध आहे. मधुमेही व्यक्तीच्या शरीरात इन्स्युलिन कमी निर्माण होते किंवा होत नाही. तेव्हा वरून इन्स्युलिन दिले जाते. नैसर्गिकपणे स्वादुपिंड हवे तेवढेच इन्स्युलिन निर्माण करतात. ही पेशींची बुद्धी, स्वादुपिंडातील रक्तवाहिन्या शरीराला किती इन्स्युलिन पाहिजे हे सांगतात. त्या सांगतात तेवढेच इन्स्युलिन तयार होते. हे इन्स्युलिन चटकन रक्तात मिसळते व कार्य होताच ते आपले काम बंद करते. ही शरीराची म्हणजेच प्रत्येक पेशीची बुद्धीवरून दिल्या जाणाऱ्या रासायनिक औषधांना कोठली असणार? आपले कार्य संपले तरी ती परिणाम करतच राहतात. ह्यात जिवंतपणा नसतो, ती जड असतात. होमिओपॅथीत ह्या जडवस्तूंचे सूक्ष्मीकरण करत करत त्यांची सुप्त शक्ती बाहेर आणली जाते व ही शक्ती जिवंत असते व ती योग्य कार्य करते. हे असे का याचे उत्तर आपल्या पेशींच्या रचनेमध्ये आढळते. सर्व पेशींचा बाह्यांशी पापुद्रा (Outer Membrane) म्हणजे पेशीची भित्तिका ही मुळात अतिशय गुळगुळीत असते. परंतु यावर अनेक केंद्रे अशी असतात की ज्यांचे बाह्य तोंड उघडे असते आणि ही केंद्रे चिकट अशा रेणूंची खळीच असते. औषधांचे अणू कार्यरत होण्यात या स्वीकारकेंद्राशी ते रेणू नीट एकरूप व्हावे लागतात. जड अणूंच्या बाबत हे कठीण असते म्हणूनच काहीच रेणू त्यांत फिट बसतात, काही नाहीत. परंतु

शरीरनिर्मित

२२८