पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हार्मोन्स, एन्झाइम्स अशी द्रव्ये त्यांना प्राप्त असलेल्या (रासायनिक) बुद्धीने योग्य केंद्राशीच एकरूप होतात. या सर्व कार्यामध्ये मनाचा फार मोठा वाटा असतो. या मनाची शक्ती जागृत करणे हे महत्त्वाचे कार्य अध्यात्म पार पाडत असते. हे करणारांचेही यश शंभर टक्के असेलच असे याला उत्तर नसले तरी काही प्रमाणात याची उत्तरे शोधता येतील. याचे दोन मार्ग आहेत :
  (१) आयुर्वेदीय पद्धतीने तीन प्रकृतिदोष पूर्णतः जाणून घेणे व प्रत्येक रुग्णाचा स्वतंत्र विचार करून त्याच्या शारीरिक व मानसिक स्तरांचा निरनिराळ्या अंगाने विचार करून उपचारांची दिशा ठरवणे. या तीन प्रकृतिदोषांची शारीरिक, मानसिक लक्षणांची माहिती ज्ञात आहे. तसेच प्रत्येक अवयवाचे वर्णनही आयुर्वेद करतो. त्यावरून गणिती पद्धतीने ह्या कल्पना थोड्याफार स्पष्ट करता येतात. (आहार एक यज्ञकर्म हे पुस्तक पहा पाहा)
  (२) हल्लीचे युग काँप्युटरचे आहे. या निरनिराळ्या स्तरांचा एक फ्लोचार्ट (Flowchart) तयार करून यश केव्हा मिळेल व केव्हा मिळणार नाही हे काही प्रमाणात शोधता येईल, असे वाटते, पण खात्री नाही. यातून आपणास अध्यात्मातून मिळणाऱ्या यशप्राप्तीचे प्रमाण थोडेफार तरी व्यक्तीव्यक्तीनुसार ठरवता येईल. हे तसे अवघड आहे. कारण त्यात खोल जाण्याचे टप्पे कसे ठरवायचे, ही खरी समस्या आहे.
मानसप्रतिमा पद्धत व विकार :   जीन अॅक्टबर्ग ही मानसशास्त्र व शरीरशास्त्रातील तज्ज्ञ. या विषयात संशोधन हा तिचा आवडता विषय. मानसप्रतिमा पद्धतीच्या संशोधनात तिने अनेक रुग्ण तपासले, त्यांची वैयक्तिक मते, श्रद्धा, दैनंदिन वागणूक, आवडीनिवडी अशा अनेक अस्थिर घटकांचा तिने अभ्यास केला होता. या पद्धतीबद्दल ती म्हणते -

 "मी जे काही पाहिले, अनुभवले ते काही वेगळेच होते. त्याचा आणि आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून (Biological course of disease-study of) केल्या जाणान्या अभ्यासाचा त्या त्या विकाराशी प्रत्यक्ष काही संबंध आहे हे मला जाणवले नाही. आणि वैद्यक व मानसशास्त्र यांचे त्या विकारांचा अभ्यास करण्यासाठी

२२९