पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निश्चित साहाय्य होते असेही आढळले नाही. उलट माझ्या सर्व वैज्ञानिक संकल्पना बाजूला ठेवून, त्या रुग्णांच्या कहाण्या लक्षपूर्वक ऐकून आपण नेहमी, परंपरेने मानवाचा इतिहास जाणून ते ज्ञान नीट वापरणे हा योग्य मार्ग वाटतो. या साऱ्या अनुभवातून रुग्णाच्या त्याच्या विकाराच्या संबंधीच्या ज्या जाणिवा आहेत व त्यातून विकारमुक्ती मिळविण्याची प्रगती यासंबंधी त्याच्या मानसप्रतिमांचा विचार जास्त महत्त्वाचा ठरतो. यामुळे मी व माझे पती फ्रँक लॉलिस यांनी आपला संशोधनाचा मार्गच बदलून या समस्येची सत्य वस्तुस्थिती शोधावयाचे निश्चित केले."

  जीनच्या दाव्याप्रमाणे मानसचित्र वा प्रतीक विकारमुक्तीस कसे उपयुक्त ठरते हे तिने 'शमान' व इतर पंथांतील या गोष्टींचा अभ्यास करून अनुभवले. तिला असे आढळले - ह्या निरनिराळ्या पंथीयांचे धर्माचार, रीतिभाती, दैनंदिन धार्मिक कार्ये यांचा विकारमुक्ती व आरोग्यप्राप्ती यासाठी अतिशय उपयोग होऊ शकतो. ही धर्मकृत्ये दैनंदिन व काही कालानंतरची अशी असू शकतात. काही वेळा संकट- मुक्तीसाठी विशेष कार्यक्रमांचीही आखणी व योजना केली जाते. यालाच वेगळ्या भाषेत तांत्रिक कार्येही म्हणता येईल. आपल्या अध्यात्मात सुद्धा ह्याचा अंतर्भाव आहे. त्यात दैनंदिन व कधीकधी मुहूर्तानुसार पाळावयाचे आचार सांगितलेले आहेत. आयुर्वेदात दिनचर्येला किती महत्त्व दिले आहे हे आपण जाणतोच. जीन अॅक्टरबर्ग, बार्बारा डॉसी व लेस्ली कोलफमेकर यांनी याबाबत खूप संशोधन केले आहे व ते लिखित स्वरूपात सहज प्राप्त आहे.
धार्मिक आचार व समारंभ :

  आपण असे गृहीत धरतो की, आपली जसजशी प्रगती होत जाते, जसजसे आपण विज्ञानवादी होत जात असतो, तसतशी आपली धर्मभावनाच कमी कमी होत जाते व धर्मकृत्ये ही एक ऐतिहासिक बाब होत असते. औद्योगिक दृष्ट्या विकसित राष्ट्रांनी हा विकास, विज्ञानाची कास धरूनच साध्य करून घेतला आहे. त्यामुळे पूर्वीचे सणवार, देवदेवतांचे जन्मदिवस, जयंत्या असे जे समारंभ आपण धार्मिक भावनेने करत होतो ते निरर्थक व विज्ञानाशी विसंगत आहेत अशी भावना झाली. या समारंभांच्या मागे धर्म ही संकल्पना त्या काळात होती. पूजाअर्चा ही दैनिक बाब, सत्यनारायण ही नैमितिक बाब, पोथीपठण, जपजाप्य हीसुद्धा दैनिक

२३०