पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोष्टींचे आकर्षण होते. परंतु त्यांच्याजवळ या गोष्टींना तपासून पाहण्याची अथवा विरोध करण्याची शक्ती नव्हती. सर्वच आदिवासी जुन्या काळी जादू, धर्म यांवर अत्यंत विश्वास ठेवणारे असे होते. सैबेरियामध्ये असणाऱ्या मूळ आदिवासी टोळ्यांचा धर्म म्हणजे 'शमानिझम्' (Shamanism). ह्यांचा जो शमाम - धर्मप्रमुख असे त्याच्या अंगी खूप दैवी शक्ती असे असा सर्वांचाच दृढ ग्रह होता. या विचारांचा प्रभाव व संस्कृती मध्य व उत्तर आशिया, उत्तर अमेरिका, युरोप व इंडोनेशियापर्यंत पसरलेला होता. हा शमाम-धार्मिक प्रमुख - सर्वत्र होता. कारण त्या काळची मानवाची गरज म्हणजे रोगावर उपाय, भुतेखेते यांचा प्रभाव घालवणे, आत्म्यांशी संभाषण इत्यादी हा करू शकत असे. आपल्या भाषेत व येथील आदिवासीत हा तांत्रिक म्हणून ज्ञात होता. वंशशास्त्रज्ञांनी ह्या निरनिराळ्या संस्कृतींमधील 'तांत्रिकां'चा अभ्यास केलेला आहे. ह्यांची अशी एक श्रद्धा होती की ते कोणत्याही प्राण्यांशी संवाद करू शकत असत. हे लोक अंतर्ज्ञानी व आत्म्याशी संवाद साधणारे होते. त्यांच्या अंगी कोणत्याही प्राण्याचे रूप घेण्याची कला होती. ही जादू. आपला आत्मा आपल्या शरीरातून बाहेर काढून ते नवे रूप घेऊ शकत असत. अगदी ह्याच तऱ्हेची संकल्पना आफ्रिकन आदिवासींमध्येही अस्तित्वात होती. त्यांचा मांत्रिक जादूने रोग बरे करू शकत असे, लांडग्याचे रूप घेऊ शकत असे. हे आपल्या वाचनात आलेले असतेच. अमेरिकेतील इंडियन जमातीत एक 'तातांगी मानी' (A walking Buffalo as he is known) नावाचा इंडिअन इ.स. १८७१ ते १९६७ या काळात होऊन गेला. तो म्हणतो -
 "तुम्हाला हे माहीत आहे का की झाडे बोलू शकतात? होय हे सत्य आहे. ती एकमेकांत संवाद करतात, तुमच्याशीही बोलू शकतात. ती तुम्हाला हवामानाचा अंदाज देतात, तुम्हाला प्राण्यांची माहीती सांगू शकतात, तर कधी कधी आत्म्यासंबंधीही बोलू शकतात. मला झाडांपासून खूप ज्ञान मिळाले आहे. परंतु ती जे सांगतात ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकले पाहिजे."

अमेरिकन इंडियन - भारतीयांना हजार वर्षांपूर्वी निश्चितच माहीत नव्हते. परंतु हजारों वर्षांपूर्वी होऊन गेलेला सत्यकाम जाबाली व आधुनिक काळातील ' तातांगी मानी' हे एकच गोष्ट तंतोतंत कशी सांगू शकतात? तातांगी मानीला सत्यकाम

२३