पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

 (५) शारीरिक व मानसिक शांती मिळवणे.
 (६) भीती, उलघाल व वेदना या कमी करणे.
 (७) आरोग्यासाठी (रुग्णाचे) प्रबोधन, शरीरसंस्थांचे कार्य व उपचाराची माहिती देणे.
 (८) जुन्या सवयींवर नियंत्रण.
 (९) त्या समयीच्या समस्या सोडवणे व अंतिम उद्देशाच्या विकासासाठी कार्य.
 (१०) इतर उपचारपद्धतींचाही वापर करणे.
 या पद्धतीचा विकास करणाऱ्या त्रयींचा असा दावा आहे की, अतिशय वेदनादायक विकारावर या पद्धतीचा उपयोग उत्कृष्ट होतो. जबर भाजलेल्या व्यक्ती, अपघातात अनेक ठिकाणचे किंवा गुंतागुंतीचे अस्थिभंग अशा केसेसमध्ये त्या रुग्णांच्या वेदना कमी करणे, त्यांची भीतिपोटी होणारी मनाची उलघाल, त्यातून निर्माण होणारे ताण कमी करणे, उपचारांना प्रतिसाद मिळवणे, ताणापोटी निर्माण होणारा निद्रानाश थांबवणे इत्यादी समस्यांमध्ये या पद्धतीचा खूपच उपयोग होतो.
 येथे असा अनुभव सांगितला जातो की या पद्धतीच्या मानसप्रतिमाद्वारा संदेश देण्यास फक्त वीस मिनिटे पुरतात. अतिशय गंभीर केसेसमध्ये ह्या उपायाची दररोज दोन-तीन आवर्तने करावी लागतील. आपण जशा विकारमुक्ती व तन्दुरुस्ती यांच्या मानसप्रतिमा निर्माण करू व त्यांचा सक्रिय अनुभव येत जातो तसतशी ती क्रिया परत परत करावयाची ओढ निर्माण होते. यातून मानसिक व कायिक आराम मिळू लागतो आणि आपण स्वतः करिता काही करू शकतो याची खात्री व विश्वास निर्माण होतो.
 (८) ढोल, ताशा, इत्यादी चर्मवाद्यांचे उपचारांत स्थान :
 या संशोधनात असे आढळून आले की धार्मिक कार्यक्रम, धार्मिक नाच या वेळी शमान जमात ढोलासारख्या वाद्यांचा उपयोग करत असे. त्यामुळे त्या धार्मिक कार्यक्रमाचे वेळी सर्व लोकांच्या उत्साहाला उधाण येत असे. काही रुग्णांचे मनोबल वाढवण्यास हे वाद्यसूर खूप उपयोगी पडतात. मग त्यांनी त्याच्या कॅसेट काढल्या व
२४१