पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या ज्यांना त्याची आवड आहे, ज्यांच्या वृत्ती या नादामुळे उचंबळून येतात त्यांच्यासाठी जर वाजवल्या तर त्यांची प्रगती आश्चर्यकारक होऊ शकते. ही ढोलवाद्ये धार्मिक कार्यक्रमांत अतिशय वेगाने वाजवली जात. डॉ. मेलिंडा मॅक्सफील्ड यी अनुभवातून असे म्हटले आहे की या वाद्यांच्या तालबद्ध नादाने मानसप्रतिमा पद्धतीला खूपच उपयोग होतो. यात सहभागी होणाऱ्या रुग्णांना पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील गुहा, प्राण्याचे बीळ यांमध्ये जाऊन हळूहळू अशी वाटचाल 'करावयाची की शेवटी त्यांना एका मैदानवजा मोकळ्या जागेत पोहोचता येते. तेथे त्यांना शकुनी व्यक्ती, प्राणी यांची प्रतिमा डोळ्यांसमोर येईल. या सर्व वेळी ड्रमच तालबद्ध आवाजात चालू असतो व तो ज्या वेळी बंद होतो तेव्हा या स्वप्ननगरीतून बाहेर यावयाचे. यातील व्यक्ती वा प्राणी यांच्या प्रतिमा या पुढेही त्याच डोळ्यांसमोर आणावयाच्या. ही व्यक्ती एखादा संत किंवा ज्या प्राण्याला धार्मिक स्थान आहे असेच प्राणी जरुरी असावेत.
 ह्या संकल्पना आपल्याकडे कधीच अशा तन्हेने वापरल्या गेल्या नाहीत. परंतु चर्मवाद्ये अनेक प्रकारांत आपल्याकडे पिढ्यान्पिढ्या अस्तित्वात आहेत. त्यांतील प्रत्येक वाद्याला स्वतंत्र अस्तित्व आहे. सकाळी चौघडा, कीर्तनासाठी पखवाज, जत्रा - मिरवणुकांसाठी ढोल, ताशा वगैरे. त्यामुळे निश्चितच निरनिराळे वातावरण भावना निर्माण होत असत. यात मुख्यतः तालबद्धता पाळली जात असे. ताल आणि सूर हा संगीताचा पाया. संगीत तर वेदकालातही होते. सामवेद हा संगीताचा वेद आहे. आपले मंत्र, आशीर्वाद वचने अशा अनेक गोष्टी तालबद्ध रीतीने म्हटली जात. संगीताचा प्रभाव आरोग्यावर केवढा पडू शकतो हे अनुभवजन्य ज्ञान आता विज्ञानानेही मान्य केले आहे. अत्यंत मंद स्वरात ख्यालवजा गायन अनेक रोगांवर उपयोगी पडू शकते. अशा संगीतामुळे गाईसुद्धा जास्त दूध देतात. मानसप्रतिमा पद्धतीत त्या शमान वाद्यांच्या कॅसेट रुग्णांना वाजवून दाखविल्या जातात, अशा भक्तिरस संगीत असलेल्या कॅसेटस् हॉस्पिटलमध्ये सुद्धा वाजवल्या जाव्यात. ॐ हा सूर म्हणजे अ + ऊ + म म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या संकल्पनेपेक्षा मला तो 'सनातन नाद' ही संकल्पना जास्त आवडते. असे म्हणतात की पृथ्वी आपल्या भोवती फिरतांना 'सा' असा षड्ज लावते. असे हे वरदायी संगीत उपचारांचा एक महत्त्वाचा भाग होऊ शकते. परमेश्वर हा करुणेचा सागर आहे असे आपण म्हणतो.

२४२