पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोष्टींकडे आता परत लक्ष वेधले जात आहे. परंतु या गोष्टी पूर्वी जवळजवळ सर्वत्र अस्तित्वात होत्या. आज 'रेकी' ही उपचारपद्धती मध्यंतरी मोठा चर्चेचा (व पैसे कमावण्याचा) विषय झाली होती. अजूनही ही अस्तित्वात असली तरी त्या पूर्वीच्या लाटेला ओसर पडला आहे. पण मुळात ही पद्धत जेव्हा धार्मिक भावनेने व संपूर्ण श्रद्धेने केली जात होती त्या वेळी ती निश्चितच उपयुक्त ठरत असे. देणाराची व घेणाराची दोघांचीही अतीव श्रद्धा हाच त्याचा पाया होता. पातंजल योगसूत्रांतील योगसाधनेमुळे मिळणाऱ्या शक्ती या आपण पाहिलेल्याच आहेत. आयुर्वेदात अनेक प्रकारचे मालीश सांगितले आहे. हे मालीश श्रद्धेने करणारा व करून घेणारा यांना सत्वर गुण मिळत असते. मालीशचा उल्लेखही या त्रयीने केला आहे. असाच उल्लेख अॅक्युप्रेशर व अॅक्युपंक्चर यांचाही त्यांनी केला आहे. एकूण ज्या गोष्टी आधुनिक विज्ञानात बसत नाहीत त्यांचा उपयोग या आधुनिक वैद्यकव्यवयासात काम करणाच्या तज्ज्ञांनी केला आहे. त्यांनी प्रत्येक रुग्णासाठी काही चार्टही तयार केले आहेत. यामुळे भीती, वेदना, उलघाल इत्यादी विकारांचा लवकर निचरा होतो असा त्यांचा अनुभव आहे.
 सर्वसाधारणपणे जेव्हा वेदना, ताण यांना आपल्याला तोंड द्यावे लागते तेव्हा नुसत्या मनाचीच उलघाल होत नाही तर शरीरही ताणात जात असते. आपले सर्व स्नायू घट्ट / कडक होतात. हे सैल करणे ही अग्रीम जरुरी असते. मानसचित्र या पद्धतीने त्या वेदनांवरच मन केंद्रित केले तर त्या कमी होतात.
सारांश :
 डॉ. जीन अॅक्टरबर्ग, बार्बारा डॉसी व लेस्ली कोलमायर यांनी ही जी मानसप्रतिमा (Imagery) पद्धत शोधून काढली तिचे थोडक्यात केलेले हे अवलोकन. त्यांनी हे पुस्तक आठ भागांत लिहिले आहे. त्यातील प्रत्येक भागाचे विहंगमावलोकन केले तर त्यावर भारतीय अध्यात्माचा कळत नकळत बराच प्रभाव पडलेला आहे, हे स्पष्ट होते. आधुनिक वैद्यकशास्त्राला पूरक म्हणून ज्या गोष्टी वैद्यकशास्त्राशी निगडीत अशा लोकांनी शोधून काढल्या, प्रयोग केले त्या सर्वांतील थोडी अतिशयोक्ती वजा hi तर आधुनिक शास्त्रात कधीही न वापरल्या गेलेल्या परंतु परंपरेने निरनिराळ्या पंथांत पूर्वी अमलात असलेल्या व ज्याला त्यांनी धर्माचे अधिष्ठान दिले होते, त्याच

२४४